आठवण म्हणून रोप लागवड आठवण म्हणून रोप लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:52+5:302021-07-20T04:18:52+5:30

कोरोनामुळे अनेक जणांना जीवाला मुकावे लागले आहे. जगातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यामुळे कोलमडून गेली. या कोरोना महामारीत मृत्यू ...

Planting a plant as a memento Planting a plant as a memento | आठवण म्हणून रोप लागवड आठवण म्हणून रोप लागवड

आठवण म्हणून रोप लागवड आठवण म्हणून रोप लागवड

Next

कोरोनामुळे अनेक जणांना जीवाला मुकावे लागले आहे. जगातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यामुळे कोलमडून गेली. या कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या मृतकांच्या कुटुंबीयांतील सदस्यांना भावनिक आधार देऊन त्यांची आठवण म्हणून पुण्याच्या त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनतर्फे 'एक आठवण, आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत तालुक्यातील गावांमध्ये रोप लागवड करण्यात येणार आहे.

या फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. चंदगड तालुक्यातील निवड केलेल्या विकासदूतांमार्फत ही रोप लागवड करण्यात येणार आहे.

चंदगड तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनामुळे ६२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या अंगणात एक झाड लावण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात तुर्केवाडी, कोवाड, कुदनूर, चिंचणे या गावांमधून झाली आहे.

त्रिशरन एनलाईटनमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प संचालक दिगंबर वाघ, कोल्हापूर जिल्हा समन्वयक अमोल माने, चंदगड तालुका समन्वयक सागर सुतार, विकासदूत महादेव कांबळे, किशोर बोकडे, अजय गावडे, रवींद्र कांबळे, संदीप पाटील, माधुरी कांबळे, ऐश्वर्या नौकुडकर, भावना जाधव, साधना खोत यांच्यातर्फे तालुक्यात एक आठवण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नुकताच तडशिनहाळ येथील जोतिबा कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा धक्का त्यांचा मुलगा युवराज यांना सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती कायम रहावी यासाठी त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनतर्फे ‘एक आठवण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत रोप लागवड करण्यात आली.

यावेळी राजू कांबळे, सरपंच शोभा कदम, विकासदूत माधुरी कांबळे, रूद्राप्पा तेली उपस्थित होते.

फोटो ओळी : तडशिनहाळ येथे रोप लागवड करताना माधुरी कांबळे यांच्यासह शोभा कदम, रुद्राप्पा तेली, राजू कांबळे उपस्थित होते.

क्रमांक : १८०७२०२१-गड-०२

Web Title: Planting a plant as a memento Planting a plant as a memento

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.