नैवेद्य नदीला अन् पिशव्या कठड्याला, कोल्हापुरातील बालिंगा पुलावरील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 04:48 PM2023-09-23T16:48:00+5:302023-09-23T16:48:14+5:30

कचऱ्याचे अघोषित डंपिंग ग्राऊंड 

Plastic bags on the bank of Balinga bridge in Kolhapur | नैवेद्य नदीला अन् पिशव्या कठड्याला, कोल्हापुरातील बालिंगा पुलावरील चित्र

नैवेद्य नदीला अन् पिशव्या कठड्याला, कोल्हापुरातील बालिंगा पुलावरील चित्र

googlenewsNext

प्रकाश पाटील

कोपार्डे : भावना आणि धार्मिकता जोपासायला प्राधान्य देण्यात भारतीय लोकांच्यात चढाओढ सुरू असते पण यामुळे निसर्गाच्या चक्राला बाधा आणण्याचे कृत्य घडत असल्याचे चित्र बालिंगा पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या लोखंडाच्या संरक्षक कटड्याकडे (रेलिंग)पाहिल्यास दिसत आहे. प्लास्टिक पिशव्यांची तोरणे बांधल्याचा प्रत्यय येत असून प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला जनतेकडूनच खो घातला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राज्यात प्लास्टिक बंदीचा फतवा काढण्याचे काम सरकारने केले असले तरी जनतेचीच माणसिकता ही प्लास्टिक बंदी झुगारून टाकण्याचे काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथे असणाऱ्या ब्रिटिश कालिन पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी रेलिंग आहे. येथे धार्मिकता जोपसणारे महाभाग पुलावर येतात आणि नेवैद्य व निर्माल्य अगदी बेमालूम नदीच्या पाण्यात फेकून देतात आणि निर्माल्य व नैवेद्द ज्या प्लास्टिक पिशवीतून आणले आहे ती पिशवी या लोखंडी रेलिंगला बांधून जातात. 

यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रेलिंगला अक्षरशः प्लास्टिकचे तोरण बांधल्याची अनुभूती होते. काही पर्यावरण प्रेमी या पुलाचे सौदर्य नष्ट होऊ नये यासाठी या पिशव्या काढतात व नष्ट करतात. पुन्हा पंधरा दिवसांनी ही रेलिंग प्लास्टिक पिशव्यानी भरून गेलेली दिसतात यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

कचऱ्याचे अघोषित डंपिंग ग्राऊंड 

बालिंगा पुलाच्या पुर्वेला अघोषित कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड बनवले गेले असून या ठिकाणी शहर व उपनगरातील विविध प्रकारच्या कचऱ्यासह जैव कचराही येथे टाकला जात असून यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

शहराच्या आरोग्याचा प्रश्न 

शहराला भोगावती नदीवरून पाणी पुरवठा करणारे पंप हाऊस बालिंगा पुलाजवळ. पुलाच्या पुर्वेला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वहाणारे ओघळ थेट पंपहाऊस जवळला जाऊन मिळाते. यामुळे शहराला पुरवठा होणारे पाणी अशुद्धच असते यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नाक हातात घेऊन प्रवास करावा लागत आहे.

बालिंगा पुल हे ऐतिहासिक आहे पण या पुलाच्या रेलिंगला अशा प्लास्टिक पिशव्या बांधल्याने ते खराब दिसत आहे. असे कृत्य करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवे. - संजय पाटील

Web Title: Plastic bags on the bank of Balinga bridge in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.