चार गावांतच प्लास्टिक बंदीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:31 AM2018-10-08T00:31:43+5:302018-10-08T00:31:48+5:30
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्लास्टिक बंदीचा मोठा गाजावाजा करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील केवळ दोन तालुक्यांतील फक्त चार गावांमध्येच प्लास्टिक बंदीची कारवाई केली आहे. उर्वरित १० तालुक्यांमध्ये पंचायत समित्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. ३० जून २०१८ नंतर करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांमधून १ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शासनाच्या पर्यावरण विभागाने २३ मार्च, ११ एप्रिल आणि २ जुलै रोजी जे आदेश दिले, मार्गदर्शक सूचना केल्या, त्यांनुसार जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जिल्ह्यात सर्वत्र कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यासाठी जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांनी याबाबत
गावपातळीवर कारवाई करणे अपेक्षित होते.
मात्र यातील केवळ करवीर आणि शिरोळ तालुक्यांतील गटविकास अधिकाºयांनी याबाबत पुढाकार घेत दंडाची कारवाई केली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांमध्ये २१ जणांवर कारवाई करीत १ लाख ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, नृसिंहवाडी या चार गावांतच ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अधिकाधिक कापड दुकानांचा समावेश आहे.
एकीकडे प्लास्टिक बंदीचा मोठा गाजावाजा केला गेला असताना केवळ चारच गावांमध्ये कारवाई करून जिल्हा परिषदेने मूळ हेतूलाच हरताळ फासल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पुणे विभागात सर्वाधिक दंड वसुली
कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ५ हजार ही जी प्लास्टिक बंदीनंतरची वसुली झाली आहे, ती पुणे विभागात सर्वाधिक दंडवसुली असल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ उर्वरित जिल्ह्यांमध्ये इतकीही दंडवसुली झालेली नाही.
१३00 किलो प्लास्टिक पिशव्यांचे संकलन
जिल्ह्यातील १0२७ ग्रामपंचायतींपैकी ८८६ गावांमध्ये एकूण १३00 किलो प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. एकदम दंडाची कारवाई न करता बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बंदी नसलेले घटक
२०० मिलिलिटरपेक्षा द्रव धारण क्षमता असलेल्या बाटल्या
निर्यातीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक
उत्पादनांसाठी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे व २० टक्के पुनर्चक्रित प्लास्टिकपासून बनविलेले प्लास्टिक
अन्नधान्य आणि किराणा माल सीलबंद प्लास्टिक पॅकेजिंग. जे ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाड आणि दोन ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे असेल.
वन, फलोत्पादन, कृषी, घनकचºयासाठी लागणारी कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी
प्लास्टिकचा एक थर असलेली खोकी
दुधासाठीच्या पिशव्या, घरगुती वापराची प्लास्टिक उत्पादने
बंदी असलेले घटक
२०० मिलिलिटरपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या
सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या
थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल ताट, कप, प्लेट, ग्लास, काटे, वाटी, चमचे, बाउल
हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे कंटेनर, स्ट्रॉ
प्लास्टिक व थर्माकोलचा वापर, सजावटीसाठीचे साहित्य