नाटकाला गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:57+5:302021-03-28T04:22:57+5:30

कोल्हापूर : आजच्या काळात नाटक पाहण्यासाठी गर्दी नको तर दर्दी रसिक हवा, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी ...

The play is more patient than crowd | नाटकाला गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचा

नाटकाला गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचा

Next

कोल्हापूर : आजच्या काळात नाटक पाहण्यासाठी गर्दी नको तर दर्दी रसिक हवा, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले. शाश्वत प्रतिष्ठानतर्फे जागतिक रंगभूमीदिनानिमित्त शनिवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या नाट्यकलाकारांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

जागतिक रंगभूमीदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक, नाट्यकर्मी चंद्रकांत जोशी, नाट्य दिग्दर्शक प्रा. प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रद्धा पोवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष एस. एस. टाकळीकर, नाट्य कलाकार किरणसिंह चव्हाण, नाट्य दिग्दर्शक प्रा. सुधीर पाटील यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे होते.

प्रा. प्रकाश इनामदार यांनी अशाश्वत लोकांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी चित्रपट निर्माते संदीप जाधव, सारिका शिंदे, संजय पाटील, प्रतिष्ठानचे संचालक संतोष परब, निखिल जाधव, करण शिंदे, माजी नगरसेवक कमलाकर भोपळे, पृथ्वीराज जगताप, हर्षवर्धन पाटील, रतन बाणदार, माजी वनाधिकारी जगन्नाथ चौगुले, रवीराज पाटील, भास्कर कांबळे आदी उपस्थित होते. सचिन जाधव यांनी आभार मानले.

फोटो : २७०३२०२१-कोल-रंगभूमीदिन

ओळी : कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठानतर्फे जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत जोशी, प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रद्धा पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.

===Photopath===

270321\27kol_3_27032021_5.jpg

===Caption===

फोटो : २७०३२०२१-कोल-रंगभूमीदिन आेळी : कोल्हापूरातील शाश्वत प्रतिष्ठानतर्फे जागतिक रंगभूमीदिनाचे आैचित्य साधून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सत्कार करण्यात आ्रला. यावेळी चंद्रकांत जोशी, प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रद्धा पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: The play is more patient than crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.