शाळेत खेळा आता  आट्यापाट्या, सेपक-टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेटॅथलॉन, सॉफ्ट टेनिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:08 AM2018-09-29T11:08:42+5:302018-09-29T11:19:48+5:30

भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे;

Play now at the school is Atyapatya, Sepak-Tara, Rabbi, Teniquite, Modern Petathlon, Soft Tennis | शाळेत खेळा आता  आट्यापाट्या, सेपक-टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेटॅथलॉन, सॉफ्ट टेनिस

शाळेत खेळा आता  आट्यापाट्या, सेपक-टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेटॅथलॉन, सॉफ्ट टेनिस

Next
ठळक मुद्देखेळ प्रकारांची संख्या ५१ वर पोहोचलीभारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली

सचिन भोसले
कोल्हापूर : भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे; त्यामुळे शालेय क्रीडा प्रकारांची आता एकूण संख्या ५१ इतकी झाली आहे.

विविध खेळांत अनेक भारतीय खेळाडूंनी जगभरात देशाचा नावलौकिक करावा. त्यातून खेळ आणि आरोग्य उत्तम राहावे. देशाची पिढी सुदृढ व्हावी. याकरिता केंद्र शासनाच्या भारतीय खेळ महासंघाने देशी खेळांसह परदेशी खेळांचाही यंदापासूनच्या शैक्षणिक वर्षात केला आहे. यात विशेष म्हणजे आट्यापाट्या हा खेळ बहुतेक मुलांच्या विस्मरणात गेला होता. त्यास पुनरुज्जीवन मिळावे म्हणून भारतीय खेल महासंघाने त्याचा पुन्हा शालेय क्रीडा प्रकारात समावेश केला आहे.

यासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन या विदेशी खेळाचाही समावेश केला आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना गेल्या महिनाभर राज्या-राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचलनालये करीत आहेत. कोल्हापुरातही अशा प्रकारची कार्यशाळा नुकतीच जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आली. यात या खेळांचे आंतरराष्ट्रीय नियम, खेळाडूंची संख्या, मैदान, रिंग, आदींची तांत्रिक माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.

या सहा खेळांमुळे आता शालेय क्रीडा प्रकारात एकूण ५१ खेळांचा समावेश झाला आहे. यापूर्वीच्या खेळांमध्ये मैदानी स्पर्धा, फुटबॉल, हँडबॉल, बॉक्सिंग, हॉकी, किक बॉक्सिंग, धनुर्विद्या, वेटलिफ्टिंग, वुशू, कुस्ती (फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन), मल्लखांब, बास्केटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, तायक्वाँदो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, तायक्वाँदो, बॉल बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, खो-खो, कबड्डी, लॉन टेनिस, स्क्वॅश, शुटिंग बॉल, कराटे, बुद्धिबळ, योगा, ज्युदो, बेसबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, वॉटरपोलो, डायव्हिंग, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल, सायकलिंग, रोलर स्केटिंग, रोलर हॉकी, रायफल शुटिंग, तलवारबाजी, रोलबॉल, सिकई मार्शल आर्ट, डॉजबॉल, आदी खेळांचा समावेश आहे.

 

नव्या व जुन्या खेळांची सांगड घालून चांगली सुदृढ पिढी घडावी. त्यातून चांगले खेळाडू राष्ट्राला मिळावेत. या उद्देशाने भारतीय खेळ महासंघ व राज्य क्रीडा व युवा संचलनालयाने नव्या सहा खेळांचा यंदापासून समावेश केला आहे.
- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर
 

 

 

Web Title: Play now at the school is Atyapatya, Sepak-Tara, Rabbi, Teniquite, Modern Petathlon, Soft Tennis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.