खेळाडूंनी जयसिंगपूरचे नाव उज्ज्वल करावे : संजय पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:04+5:302021-05-06T04:25:04+5:30

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने स्केटिंग ट्रॅकचा लोकार्पण सोहळा पार पडला. पहिली गल्ली ते ...

Players should make Jaysingpur famous: Sanjay Patil-Yadravkar | खेळाडूंनी जयसिंगपूरचे नाव उज्ज्वल करावे : संजय पाटील-यड्रावकर

खेळाडूंनी जयसिंगपूरचे नाव उज्ज्वल करावे : संजय पाटील-यड्रावकर

Next

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने स्केटिंग ट्रॅकचा लोकार्पण सोहळा पार पडला. पहिली गल्ली ते नगरपालिकेची शाळा क्र. ३ च्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून हा स्केटिंग ट्रॅक सुरू करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नीता माने व उपनगराध्यक्ष यड्रावकर यांच्या हस्ते स्केटिंग ट्रॅकचे लोकार्पण झाले. दादासो पाटील-चिंचवाडकर यांनी स्वागत केले.

याप्रसंगी संगीता पाटील-चिंचवाडकर, प्रवीण इंगळे, सुरेश पाटील, प्रेमला मुरगुंडे, दीपा झेले, सुलक्षणा कांबळे, संभाजी मोरे, शैलेश चौगुले, महेश कलकुटगी, अर्जुन देशमुख, राजेंद्र झेले, तेजस पाटील व स्केटिंग खेळाडू उपस्थित होते. राहुल बंडगर यांनी आभार मानले.

फोटो - ०५०५२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे स्केटिंग ट्रॅकचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, राहुल बंडगर, दीपा झेले, प्रेमला मुरगुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Players should make Jaysingpur famous: Sanjay Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.