तांत्रिक कर्मचाऱ्यांचीच वानवा, सांगा, कसा होणार सुरळीत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:50+5:302021-08-20T04:27:50+5:30

प्रकाश पाटील कोपार्डे : कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा तसा नेहमीच अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. या-ना त्या कारणाने कोणत्या ना ...

Please tell, whats the story of them big puppys ........... | तांत्रिक कर्मचाऱ्यांचीच वानवा, सांगा, कसा होणार सुरळीत पाणीपुरवठा

तांत्रिक कर्मचाऱ्यांचीच वानवा, सांगा, कसा होणार सुरळीत पाणीपुरवठा

Next

प्रकाश पाटील

कोपार्डे : कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा तसा नेहमीच अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. या-ना त्या कारणाने कोणत्या ना कोणत्या भागात कमी दाबाने वा पाणीच न येण्याची ओरड नेहमीचीच आहे. नागरिकांनी आवाज उठविला की प्रशासनही तांत्रिक कारणे सांगून हात झटकते. मात्र, जेथून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो त्या बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर पंपिंग स्टेशनवरच तांत्रिक कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी अनंत अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराला नित्यनिमाने पाणीपुरवठा करायचा असेल तर या पंपिंग स्टेशवर रिक्त असलेली तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे भरण्याच गरज निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बालिंगा, शिंगणापूर व नागदेववाडी पंपिग स्टेशनमधून भोगावती नदीतून पाणी उपसा केला जातो. यातून शहरातील विविध भागांत पाणी वितरित केले जाते. मात्र, या सर्व यंत्रणेला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तीनही पंपिंग स्टेशनवर ६१ पदांची आवश्यकता आहे, पण २७ कायम कर्मचारीच रोजंदारी व ठोक कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन शहर पाणीपुरवठ्याचा गाडा हाकत आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी कमी असल्याने एखादा बिघाड झाला तर शहराच्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होऊन जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

चौकट : इलेक्ट्रिक इंजिनिअरचे काम ऑटोमोबाईल इंजिनिअरवर

शहराची पाणीपुरवठा यंत्रणा ही संपूर्णतः इलेक्ट्रिक यंत्रणेवर चालते, पण या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरची नेमणूक करण्यात आली आहे. जर सुरक्षेच्या कारणास्तव महावितरण कंपनीने आक्षेप घेतला तर ते वीजपुरवठा बंद करू शकतात. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे १४ पंपिंग स्टेशन आहेत. यासाठी एक जल अभियंता, एक इलेक्ट्रिक इंजिनिअर, प्रत्येक पंपिंग स्टेशनला स्वतंत्र ऑपरेटर व किमान ५ ते ७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, पण जीवबा नाना पार्क, निर्मल चौक, आर. के. नगर, मोरेवाडी व राजारामपुरी येथे ऑपरेटर पद रिक्त आहे. येथे चावीवालाच ऑपरेटरचे काम करतो.

Web Title: Please tell, whats the story of them big puppys ...........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.