वचन पावित्र्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:13 PM2020-02-29T17:13:03+5:302020-02-29T17:14:56+5:30

पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली.

Pledge Receipt Officers Sworn In: Vacation Guaranteed Work | वचन पावित्र्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

 कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाच दिवसांच्या आठवड्याच्या मोबदल्यात कामाची हमी देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी भूषण देशपांडे, सुनीता नेर्लीकर, नितीन देसाई, भाऊसाहेब गलांडे, संजय श्ािंदे, ज्ञानदेव वाकुरे, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देवचन पावित्र्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथसुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी

कोल्हापूर : पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

अधिकारी-कर्मचाºयांनी दिलेली शपथ अशी - ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुरोगामी भूमीतील नागरिक असण्याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे. या थोर पुरुषांच्या महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे अथक प्रयत्नशील असतो.

यापुढेही कार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा अथवा सुट्ट्या यांमुळे जनतेच्या कामांत कोणतीही अडचण येणार नाही. आमची सर्व ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह यांद्वारे २१व्या शतकातील वैभवशाली नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध होत आहोत. वचनाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जनतेचे सेवक या नात्याने आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे आम्ही स्वीकारीत असून, त्याची हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत.’ अशी शपथ घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी दिली.

 

 

Web Title: Pledge Receipt Officers Sworn In: Vacation Guaranteed Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.