कोल्हापूर ‘सायबर’मध्ये शिक्षण वाचविण्याची घेतली प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:58 PM2018-02-26T21:58:06+5:302018-02-26T21:58:06+5:30
कोल्हापूर : शिक्षण वाचवा कृती समिती आणि सायबर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सायबर येथे ‘शिक्षण संविधानाला वाचवा’ अशी प्रतिज्ञा
कोल्हापूर : शिक्षण वाचवा कृती समिती आणि सायबर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सायबर येथे ‘शिक्षण संविधानाला वाचवा’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. या अभियानात सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.
सायबर संस्थेच्या पटांगणात झालेल्या या शिक्षण हक्क प्रतिज्ञा अभियानावेळी कृती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे म्हणाले, शासनाने १३१४ शाळा बंद करण्याचा व गरिबांच्या शाळा मोठ्या उद्योगपतींच्या कंपन्यांना देण्याचे षङ्यंत्र रचले आहे. या राज्यातील युवकांनी हे षङ्यंत्र फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी हाणून पाडावे.
भरत रसाळे म्हणाले, शासनाला बहुजन समाजातील विद्यार्थी शिकताना पहावत नाही, या धोरणाविरुद्ध लढा उभारू. समन्वयक अशोक पोवार म्हणाले, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना एसएमएस पाठवून युवाशक्तीची ताकद दाखवून देण्याची गरज आहे. यावेळी सूत्रसंचालन रमेश मोरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना विविध माध्यमातून मेसेज पाठविण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रसासन अधिकारी विनायक साळोखे, डॉ. एस. एस. आपटे, डॉ. के. एन. रानभरे, डॉ. के. प्रदीपकुमार, डॉ. पी. एस. रणदिवे, डॉ. व्ही. बी. शर्मा, किशोर ढवळे, कृती समितीचे वसंतराव मुळीक, रघुनाथ कांबळे, सुभाष देसाई, लाला गायकवाड, भरत रसाळे, महादेव पाटील, श्रीकांत भोसले, राजाराम सुतार आदी उपस्थित होते.
शिक्षण वाचवा कृती समिती आणि सायबर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सायबर येथे ‘शिक्षण संविधान वाचवा’अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.