बेसुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:53 PM2018-06-28T23:53:58+5:302018-06-28T23:54:07+5:30

 Plenty of trees in wildlife | बेसुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत

बेसुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत

googlenewsNext

विक्रम पाटील।
करंजफेण : अनेक दिवसांपासून पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांमध्ये गव्यांबरोबर तस्कर हत्तीनेही धुमाकूळ घातल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असतानाच यवलूज-पडळ परिसरामध्ये खुद्द बिबट्याने एका शेतकऱ्याला अवघ्या काही अंतरावरून दर्शन दिल्यामुळे व वनअधिकाºयांनी पाऊलखुणा ओळखल्यामुळे बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केला असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. वन्यप्राणी डोंगर-दºया सोडून लोकवस्तीत शिरकाव का करत आहेतहा चिंतनाचा विषय बनून राहिला आहे.
एकेकाळी पन्हाळा, शाहूवाडी परिसर घनदाट जंगल व झाडा झुडपांचा भाग म्हणून ओळखला जात होता, परंतु दिवसेंदिवस डोळ्यांदेखत होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे रिकामी होत चाललेली जंगले, त्यामुळे येथील डोंगर परिसर भकास होऊ लागला आहे.

वनखात्याचा बेसुमार वृक्षतोडीवर अंकुश न राहिल्यामुळे घनदाट जंगले भुईसपाट झाली असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येऊ लागल्यामुळे लहानमोठ्या जंगली प्राण्यांना लपण्यासाठीसुद्धा जागा न राहिल्यामुळे छोटे छोटे जंगलात वावरणारे प्राणी दुर्मीळ होऊ लागले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांची
भक्ष्याची साखळी तुटली असल्यामुळे अन्नाच्या शोधासाठी हत्ती, बिबट्या यासारख्या अजस्त्र प्राण्यांना लोकवस्तीत येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. लोकांना फोटोत पाहायला मिळणारे हे अजस्त्र प्राणी लोकांच्या प्रत्यक्ष समोर येऊ लागल्यामुळे निसर्गप्रेमींना त्यांच्या अस्तित्वाची चिंता लागून राहिली आहे.बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम जंगलातील प्राण्यांबरोबर हवामानावर सुद्धा झाल्यामुळे निसर्गात ऋतूबदल दिसत आहेत. त्याचा प्रामुख्याने पावसावर मोठा परिणाम दिसून
येत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांपुढे पाण्याचा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे.

तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सपाट झालेल्या जंगल परिसरामध्ये नवीन झाडे लावून संवर्धन करण्याची गरज आहे. वर्षाला शतकोटी वृक्षलागवडीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करून लावलेली हजारो रोपे उन्हाळ्यामध्ये तग धरून आहेत की नाहीत, त्यांचे योग्य प्रकारे संगोपन होत आहे का नाही याची वरिष्ठांनी प्रत्यक्ष भेट देऊन दखल घेण्याचीही तितकीच गरज आहे.
त्याचबरोबर कायद्याचा बडगा दाखवून बेसुमार वृक्षतोडीवर तातडीने अंकुश ठेवून वनखात्याने वेळीच यश संपादन केले, तरच वन्यप्राण्यांचे अस्तित्व अबाधित राहू शकेल. अन्यथा वन्यप्राण्यांनी जिवाच्या आकांताने लोकवस्तीत शिरकाव केल्यावर भविष्यात कोणाला नवल वाटायला नको.

Web Title:  Plenty of trees in wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.