खुशखबर! 'पी.एम' पेन्शन योजना; जिल्ह्यातील १.९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 11:38 AM2022-01-05T11:38:21+5:302022-01-05T11:38:53+5:30

जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. ते पात्र आहेत, मात्र त्यांची नोंदणी कृषी विभागाने की, महसूल विभागाने करायची हा वाद आहे

PM pension scheme 38 crore deposited in the accounts of 1.94 lakh farmers in the kolhapur district | खुशखबर! 'पी.एम' पेन्शन योजना; जिल्ह्यातील १.९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी जमा

खुशखबर! 'पी.एम' पेन्शन योजना; जिल्ह्यातील १.९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी जमा

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणारी ‘पी. एम. किसान’ योजनेंतर्गत पेन्शन जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. त्यांच्या बँक खात्यावर ३८ कोटी ८६ लाख रुपये जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होणार आहे.

केंद्र सरकारने २०१९ मध्ये पी. एम. किसान पेन्शन योजना सुरु केली. ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार ४७६ शेतकऱ्यांना योजना सुरु झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला होता. त्यानंतर चार महिन्याला शेतकऱ्यांची संख्या कमी अधिक होत गेली.

या योजनेतील लाभार्थ्यांविरोधात तक्रारी झाल्यानंतर चौकशी झाली आणि त्यानंतर ही संख्या कमी होत गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये ३ लाख ४८ हजार २९१ शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली. आता १ लाख ९४ हजार ३२६ शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ते जमा झाले.

४० हजार शेतकऱ्यांना अद्याप पेन्शनची प्रतीक्षाच

जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. ते पात्र आहेत, मात्र त्यांची नोंदणी कृषी विभागाने की, महसूल विभागाने करायची हा वाद आहे. या वादात जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील ३,२०० शेतकऱ्यांची पेन्शन थांबवली

पेन्शन योजनेत आयकर परतावा करणारे, सरकारी कर्मचाऱ्यांसह इतर लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. चौकशीमध्ये अशा प्रकारचे १६ हजार शेतकरी आढळले. त्यातील ३,२०० शेतकऱ्यांची पेन्शन थांबवली आहे.

याेजना सुरु झाल्यापासून अशी मिळाली पेन्शन -

हप्ता        लाभार्थी

पहिला - ५ लाख ३० हजार ४७६

दुसरा - ५ लाख ४१ हजार ७७८

तिसरा - ५ लाख ३७ हजार ८८२

चौथा - ५ लाख ३२ हजार २१८

पाचवा - ५ लाख २३ हजार ३५२

सहावा - ४ लाख ५९ हजार १४७

सातवा - ४ लाख ५९ हजार ४६

आठवा - ३ लाख ४८ हजार २९१

नववा - १ लाख ९४ हजार ३२६

Web Title: PM pension scheme 38 crore deposited in the accounts of 1.94 lakh farmers in the kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.