पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न, राजकीय घडामोडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:59 PM2020-11-10T15:59:16+5:302020-11-10T16:00:31+5:30
bhogawati, sugerfactory, p.n.patil, kolhapurnews भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा आमदार पी.एन. पाटील यांनी दिल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील जेष्ठ मंडळी संचालक मंडळ यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आज दुपारी चार वाजता संचालक मंडळ सामूहिक राजीनामे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्याकडे राजीनामे देणार आहेत.
राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा आमदार पी.एन. पाटील यांनी दिल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील जेष्ठ मंडळी संचालक मंडळ यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आज दुपारी चार वाजता संचालक मंडळ सामूहिक राजीनामे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्याकडे राजीनामे देणार आहेत.
साडेतीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची दहा वर्षाची सत्ता एक हाती उलथवून आमदार पी.एन. पाटील यांनी काँग्रेसची सत्ता भोगावती कारखान्यावर आणली होती. आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी व सभासदांनी त्यांना भरघोस मतांनी विजय केले होते.
भोगावती ची घसरली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने प्रामाणिकपणे केला होता. मात्र अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्या राजीनाम्याने शेतकरी, कामगार व सभासदांचा भ्रमनिरास झाला आहे.
भोगावतीचे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांनी राजीनामा मागे घेऊन पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व संचालकांनी आपले राजीनामे आज दुपारी चार वाजता अध्यक्ष पी.एन. पाटील यांचेकडे देणार आहेत.