पीएन पाटील यांचा भोगावती कारखान्याचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 01:39 PM2020-11-10T13:39:50+5:302020-11-10T18:49:15+5:30
bhogawati, sugerfactory, p.n.patil, kolhapurnews परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. परंतू हा राजीनामा अद्याप संचालक मंडळाने स्विकारलेला नाही. आमदार पाटील यांनीच अध्यक्षपद कायम राहावे असा त्यांचा आग्रह आहे. आमदार पाटील राजीनामा पत्र देवून कारखान्यांवरून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. परंतू हा राजीनामा अद्याप संचालक मंडळाने स्विकारलेला नाही. आमदार पाटील यांनीच अध्यक्षपद कायम राहावे असा त्यांचा आग्रह आहे. आमदार पाटील राजीनामा पत्र देवून कारखान्यांवरून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
कारखान्यासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खूप चांगले सहकार्य केले, त्यामुळे कारखाना चांगला चालवू शकलो, अशी भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आमदार पाटील हे गेली सव्वा तीन वर्षे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याचा अध्यक्ष म्हणून तेथील प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालावे लागते त्यामध्ये जास्त वेळ द्यावा लागत असल्याने आमदार म्हणून मतदार संघातील विकास कामांचा पाठपुरावा, राजीवजी सूतगिरणीची कामे मार्गी लावण्याकडे पुरेसा वेळ देता येत नाही हे राजीनामा देण्यामागील कारण आहे. कारखान्याच्या ६३ वर्षाच्या इतिहासात स्वत:हून कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीरामा देणारे आमदार पाटील हे पहिले अध्यक्ष आहेत.
कारखान्याचे राजकारण गेली पंचवीस वर्षे मी पाहत आहे त्यावेळी मी कुठे अध्यक्ष होतो त्यामुळे आता मीच कशाला अध्यक्ष पाहिजे. मी माझ्या अन्य कामांमध्ये लक्ष घालतो आणि कारखान्याला सगळी मदत करत राहणारच फक्त तुमच्यातील कोणीतरी ही जबाबदारी घ्या असे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे. परंतू संचालक त्यांचे ऐकायला तयार नाहीत.
तुमच्यामुळे कारखाना गेल्या तीन वर्षात रुळावर आला आहे. सभासदांनी कारखान्याची सुत्रेही तुम्ही नेतृत्व करणार म्हणून दिली आहेत त्यामुळे तुमचा राजीनामा आम्ही मंजूर करणार नाही असे सर्व २२ संचालकांचा एकमुखी आग्रह आहे. त्यामुळे यातून काय निर्णय होतो हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.