कविता ही तर कवीचे आत्मचरित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:45+5:302021-03-10T04:23:45+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे ‘मी आणि माझी कविता’ या विषयावर व्याख्यान झाले. कविता हा कवीचा ...
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे ‘मी आणि माझी कविता’ या विषयावर व्याख्यान झाले. कविता हा कवीचा आत्मस्वर असतो. विविध छंदातून आपल्या संवेदनाची अभिव्यक्ती करत असताना तो आपल्या अनुभवाचीच मांडणी करीत असतो, असे गौरी भोगले यांनी सांगितले. त्यांनी आपल्या काव्यनिर्मितीची सामाजिक वाङ्मयीन पार्श्वभूमी स्पष्ट केली. स्वरचित हायकूंचे, प्रासंगिक व मुक्तछंदातील काव्याचे सादरीकरण त्यांनी केले. पानगळ, वसा, रिंगण, चांदणवेळ, कोण आहेत ते नसतील तर या कविता सादरीकरणातून त्यांनी आत्ममग्नता, सामाजिक अंतरंगाचे दर्शन घडविले. यावेळी डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण साठे यांनी आभार मानले.
फोटो (०९०३२०२१-कोल-गौरी भोगले (विद्यापीठ) : शिवाजी विद्यापीठात सोमवारी महिला दिनानिमित्त कवयित्री गौरी भोगले यांचे मराठी अधिविभागात व्याख्यान झाले.