‘पोलादी माणसं’ने स्फुल्लिंग पेटविल

By admin | Published: February 2, 2015 12:48 AM2015-02-02T00:48:51+5:302015-02-02T00:49:28+5:30

प्रदीप बावडेकर : दत्ता जोशींच्या पुस्तकाचे प्रकाशन

'Poladi Manasan' spinning patilah | ‘पोलादी माणसं’ने स्फुल्लिंग पेटविल

‘पोलादी माणसं’ने स्फुल्लिंग पेटविल

Next

कोल्हापूर : अपार मेहनत आणि कष्ट या जोरावर असामान्य कर्तृत्व निर्माण करणारी माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात जातात. समाज व राष्ट्राच्या प्रगतीचा हिस्सा बनतात. मात्र, अशा कर्र्तृत्ववान माणसांना ध्येयापर्यंत जाण्यासाठी ‘पोलादी माणसं’ या पुस्तकरूपाने पुन्हा त्यांच्यामधील स्फुल्लिंग पेटविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ‘मिटकॉन’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप बावडेकर यांनी केले. दत्ता जोशी लिखित व पोलाद उद्यमिता प्रतिष्ठानच्या ‘पोलादी माणसं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम महाविद्यालय येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने होते. बावडेकर म्हणाले, आतापर्यंत दत्ता जोशी यांनी बीड, लातूर, कोल्हापूर, सातारासह अन्य जिल्ह्यांतील ३९० कर्तृत्ववान, पोलादी माणसांचे चित्रण आपल्या पुस्तकात केले आहे. यामधील माणसं संकटे आली म्हणून कधी डगमगूनही गेलेली नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देत ती उच्च स्थानावर पोहोचली आहेत. कोल्हापुरातही ३३ पोलादी माणसांचे कर्तृत्व या पुस्तकातून जगापुढे मांडले असून, यात माणसं जोडण्याचे काम होणार आहे. पुस्तकाबद्दलची माहिती प्रतिष्ठानचे सुनील गोयल यांनी दिली; तर निवृत्त कर्नल शिवाजीराव थोरात व उद्योजक संजय कारखानीस यांनी मनोगत व्यक्त केले.

ही आहेत ३३ पोलादी माणसे
संजय कारखानीस, संजीव गोखले, व्ही. एन. देशपांडे, संतोष साधले, काव्यश्री नलवडे, डॉ. शिवराम भोजे, धनाजी भाटले, मनोहर जठार, जयदीप मोघे, दशरथ मलकापुरे, श्रीकांत प्रभुदेसाई, राजेश शेटे, एम. बी. शेख, दिगंबर पाटकर, कविता कडेकर, विनायक होगाडे, सुभाष पाटील, शीतल केटकाळे, अण्णासाहेब चकोते, विश्वास चव्हाण-पाटील, सुबोध भिंगार्डे, महादेव बाड, बाबूराव व शिवाजी कचरे, अण्णासाहेब पाटील, तेजस्विनी सावंत, डॉ. सतीश पत्की, कांचनताई परुळेकर, चंद्रशेखर धर्माधिकारी, अदृश काडसिद्धेश्वर स्वामी, नसीमा हुरजूक, डॉ. धनंजय गुंडे, डॉ. मधुकर बाचुळकर, कर्नल शिवाजीराव थोरात (निवृत्त).

Web Title: 'Poladi Manasan' spinning patilah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.