गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:46+5:302021-03-30T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याऐवजी गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य देण्याचा अभिनव उपक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याऐवजी गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य देण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथील कार्यकर्त्यांनी सलग २४ व्या वर्षी कायम ठेवला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटविण्याची प्रथा आहे. त्यासाठी संपूर्ण गावातून गोवऱ्या जमा करून होळी पेटवली जाते. त्यानंतर संपूर्ण गावातील घरा-घरातील पुरणपोळ्या, भात, नारळ असा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा गावात होती. मात्र होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे हजारो पोळ्या, भात आणि नारळांची नासाडी होते. म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यासाठी ग्रामस्थांचे मतपरिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. एस. पी. चौगले यांनी २३ वर्षांपूर्वी घेतला. गेली सलग २४ वर्षे यशस्वीपणे हा उपक्रम चालू आहे.
सरपंच वसंत तोडकर, प्रा. एस. पी. चौगले, प्रा. एस. ए. पाटील, पोलीसपाटील सुरेश पाटील, ग्रा.पं. सदस्य महादेव पाटील, नामदेव पाटील, गणेश गुरव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
वाकरे (ता. करवीर) येथे होळीचा नैवेद्य गोरगरिबांना देण्याची परंपरा गेली २४ वर्षे कायम आहे. यंदाही जमा झालेल्या नैवेद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच वसंत तोडकर, प्रा. एस. पी. चाैगले आदी उपस्थित होते. (फोटो-२९०३२०२१-कोल-वाकरे)