(सरत्या वर्षाला निरोप-जगणे कुलुप बंद) पोलीस विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:00+5:302020-12-28T04:14:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाने सारेच लॉकडाऊन केले. डॉक्टरपाठोपाठ समन्वयाची भूमिका पोलिसांना पार पाडावी लागली. त्यामुळे पोलिसांना ‘खरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाने सारेच लॉकडाऊन केले. डॉक्टरपाठोपाठ समन्वयाची भूमिका पोलिसांना पार पाडावी लागली. त्यामुळे पोलिसांना ‘खरे कोरोना योध्दा’ म्हणून संबोधले गेले. त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम झाला.
- गुन्हेगारी कमालीची घटली, पण खुनांचे प्रमाण वाढले.
- एप्रिल-मेमध्ये दरवर्षी वाढणाऱ्या चोऱ्या-घरफोडयांचे प्रमाण घटले.
- लॉकडाऊनमध्ये संचारबंदीत सेवा, प्रबोधन व कायद्याचा बडगा या तिन्हीही भूमिका पोलिसांनी बजावल्या.
- १ मे महाराष्ट्र दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २१ सप्टेंबर पोलीस स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात न करता, मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
- आतापर्यत सर्वात जास्त वाहनांवर जप्तीची कारवाई प्रथमच झाली.
- वर्षभरातील पोलीस कर्तत्वाचा राष्ट्रपती पदक व महासंचालक सन्मान पदक सोहळाही यावर्षी ऑनलाईनवरच आटोपता घेतला.
- एप्रिल-मेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑगस्टमध्ये झाल्या.
- राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर परिक्षेत्र टीमची घोषणा झाली, पण स्पर्धा प्रथमच रद्द झाल्या.
- न्याय व्यवस्थेतील कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी न्यायालय व पोलीस प्रशासन समन्वयाने आरोपींना ‘व्हीसी’द्वारे न्यायालयात हजर करावे लागले.
------ तानाजी पोवार, कोल्हापूर