लाच स्वीकारणारे पोलीस आता कायमचे जाणार घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:54 AM2019-05-27T05:54:21+5:302019-05-27T05:54:28+5:30
पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे.
- एकनाथ पाटील
कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड कमी होणार आहे. सध्या कोल्हापूर पोलीस दलामध्ये वर्षभरात २० पोलीस निलंबित आहेत.
मुंबई पोलीस दलामध्ये भ्रष्टाचार वाढल्याने पोलीस कमिशनर सुबोधकुमार जायस्वाल यांनी लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित नाही तर थेट नोकरीवरून काढून टाकण्याचे आदेश काढले आहेत. हा निर्णय पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना यापुढे हा आदेश लागू होणार असल्याने भ्रष्ट अधिकाºयांच्या झोपा उडाल्या आहेत.
महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्टेशन, आदी प्रशासकीय कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाºया अधिकारी व कर्मचाºयांमध्ये पोलीस दल ‘नंबर वन’ आहे. त्यामुळे ‘खा’की अशी ओळख पोलीस खात्याची झाली आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाºया गुन्ह्यांतील आरोपीसह फिर्यादीकडून तपास अधिकारी किंवा कर्मचारी वरकमाई मिळविण्याचा प्रयत्न करतात. पैशांच्या भुकेने पछाडलेला काही वर्ग आजही पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. लाच स्वीकारल्यानंतर अटक होऊन दोन दिवसांनी अहवाल मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित केले जाते. पुन्हा सहा महिन्यांनंतर ते पोलीस खात्यात नियमित रूजू होतात.
पोलीस दलामध्ये लाच घेणाºयांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पोलीस दलाची पुरती नाचक्की होते. एकीकडे सरकार स्वच्छ आणि इमानदार प्रतिमा असल्याचा दावा करत आहे; परंतु दुसरीकडे पोलीस दलामध्ये भ्रष्टाचार वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारचा दावा खोटा ठरत आहे. यापुढे लाच घेणाºया अधिकारी, कर्मचाºयाला थेट ‘घरचा रस्ता’ दाखविला जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील बहुतांशी अधिकारी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
>यासाठी घेतली जाते लाच...
आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे
प्रतिबंधक कारवाई न करणे, अटक न करणे
‘एम केस’चा तपास फिर्यादीच्या बाजूने करणे
तक्रारदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई न करणे
मुद्देमाल परत देणे
न्यायालयाने बजावलेले समन्स न देणे
गंभीर गुन्ह्यात अटक टाळणे
गंभीर कलम कमी करण्यासाठी
>आमिषाला बळी पडू नका
पोलीस ठाण्यात येणाºया नागरिकांशी कसे बोलले जाते. कोणाशी मोबाईल किंवा समोरासमोर बोलताना कशाप्रकारे व्यवहार केला जातो. त्यावर पोलिसांची एक विशेष यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडायचे नाही, अशा सूचनाही वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत.
>लाचखोर पोलीस अधिकारी किंवा कर्मचाºयांना पोलीस दलामध्ये पुन्हा रूजू होण्याचा अधिकार नाही. त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळते. न्यायालयात जाऊन पुन्हा रूजू होण्याच्या मार्गावर प्रयत्न करत असले तरी त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया आमच्याकडून सुरू असते.
- डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक