विसर्जन कुंडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:37+5:302021-09-15T04:29:37+5:30

कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जनासाठी मंगळवारी नदी, तलावसह चौकाचौकात उभारलेल्या विसर्जन कुंडांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवला. कोल्हापूर शहर व ...

Police are on high alert at the immersion tank | विसर्जन कुंडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

विसर्जन कुंडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

Next

कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जनासाठी मंगळवारी नदी, तलावसह चौकाचौकात उभारलेल्या विसर्जन कुंडांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवला. कोल्हापूर शहर व परिसरात सुमारे ५०० हून अधिक पोलीस, सुरक्षा दलाच्या नऊ तुकड्यांद्वारे बंदोबस्त बजावला. स्वत: पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी क्रशर खण, रंकाळा तलाव परिसरात फेरफटका मारून बंदोबस्ताचा अंदाज घेतला.

घरगुती गणेश विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी तसेच नदी अगर तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करून नये, विसर्जनस्थळी वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त होता. रंकाळा तलाव परिरसराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. ही वाहतूक इतरत्र मार्गांवरून वळवली होती. दुपारनंतर शहरात अवजड वाहतुकीला प्रतिबंध केला होता, ही वाहतूक रिंग रोडवरून अवजड वाहतूक वळवली होती.

शहराच्या चौकाचौकातील ११२ ठिकाणी उभारलेल्या १५८ विसर्जन कुंडांवर प्रत्येकी एक पोलीस व एक होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते. विशेष म्हणजे, पोलिसांनीही विसर्जन करण्यासाठी भाविकांना मदतीचा हातभार लावला. इराणी खण परिसरात पोलिसांसह एसआरपी व आरसीपीच्या चार तुकड्यांनी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी मदत केली.

मंगळवारी जिल्ह्यात सुमारे ३० पोलीस अधिकारी, ५०० हून अधिक पोलीस, आरसीपी, क्यूआरटी, एसआरपीच्या १२ तुकड्या तसेच दीड हजार होमगार्ड तैनात केले होते.

Web Title: Police are on high alert at the immersion tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.