पाच हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक, रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 07:11 PM2021-02-11T19:11:22+5:302021-02-11T20:00:25+5:30
Bribe Case Police Kolhapur- वडगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीवर पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले (रा. प्लॉट नं -३०, भोसलेवाडी, कोल्हापूर ) याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सुहास जाधव
पेठवडगाव: वडगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीवर पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले (रा. प्लॉट नं -३०, भोसलेवाडी, कोल्हापूर ) याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराविरोधी वडगाव पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता पोलीस उपनिरीक्षक भोसले यांने पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.
याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावला. यावेळी लावलेल्या सापळ्यात पोलीस उपनिरीक्षक भोसले पाच हजार रुपयाची घेताना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम. सुनिल घोसाळकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.