‘लिडकॉम’ केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार होणार-सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:23 PM2019-09-09T14:23:50+5:302019-09-09T14:26:29+5:30

संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळा (लिडकॉम)च्या कोल्हापुरातील उत्पादन केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार करून कारागिरांच्या कामाला हमी दिली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा हा पुणे विभागातील पहिला प्रकल्प असून, अन्य सात विभागांतही तो राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Police boots, belts will be made from 'Lidcom' center | ‘लिडकॉम’ केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार होणार-सुरेश खाडे

कोल्हापुरातील सुभाषनगर येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या चर्मोद्योग, शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या जागेचे भूमिपूजन सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश जाधव, संजय पवार, राजेश ढाबरे, दुर्वास कदम, रघुनाथ मोरे, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे‘लिडकॉम’ केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार होणार चर्मोद्योग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा पहिला प्रकल्प कोल्हापुरात

कोल्हापूर : संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळा (लिडकॉम)च्या कोल्हापुरातील उत्पादन केंद्रातून पोलिसांचे बूट, बेल्ट तयार करून कारागिरांच्या कामाला हमी दिली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा हा पुणे विभागातील पहिला प्रकल्प असून, अन्य सात विभागांतही तो राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सुभाषनगर येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या चर्मोद्योग, शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या जागेचे भूमिपूजन व इमारत नकाशाच्या अनावरणप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘लिडकॉम’चे संचालक माजी आमदार बाबूराव माने, राजेश खाडे, दत्तात्रय गोतीसे, सरोज भिसुरे, व्यवस्थापक सुभाष भोगे, जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार, व्ही. एस. चव्हाण, अमोल शिंदे, नगरसेविका सविता घोरपडे, अबकारी विभागाचे उपायुक्त गणपत चौगुले, आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.

डॉ. खाडे म्हणाले, ‘या उद्योगात इतर समाज मोठ्या प्रमाणात उतरला आहे. चर्मकार समाजानेही विशेषत: युवकांनी आता दोन पावले पुढे आले पाहिजे. शासनही दोन पावले पुढे यायला तयार आहे. हस्तकलेला प्राधान्य असून, कोल्हापूरजवळच्या कर्नाटक, गोवा राज्यांमध्येही कोल्हापुरी चप्पलचा उद्योग वाढविला पाहिजे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग नेहमीच पाठीशी राहील.

मुद्रा योजना, विविध महामंडळे यांच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योजक बनविण्यासाठी पंतप्रधानांनी प्राधान्याने योजनांची अंमलबजावणी केली आहे. ‘लिडकॉम’च्या माध्यमातून अल्प व्याजदरावर उद्योजकांना कर्ज देण्यात येते. त्याच लाभ घ्यावा.’

संजय पवार, महेश जाधव, दुर्वास कदम, बाबूराव माने, आदींनी मनोगत व्यक्त केले. ‘लिडकॉम’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे यांनी स्वागत केले. वित्तीय सल्लागार हणमंत कांबळे यांनी आभार मानले. यावेळी सुभाष रामुगडे, अशोक गायकवाड, रघुनाथ मोरे, अरुण सातपुते, कृष्णात चौगले, आदी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात संत रोहिदास स्मारक

शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रत्येक तालुक्याला १00 मुलांसाठी आणि १00 मुलींसाठी निवासी वसतिगृहे, तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्याला स्मारक उभे करण्यात येत आहे.

या धर्तीवर संत रोहिदास महाराज यांचे साडेअकरा कोटींचे स्मारक प्रत्येक जिल्ह्याला उभे करण्यात येणार आहे, असे मंत्री खाडे यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र सरकारतर्फे विविध योजनांच्या माध्यमातून १२७६ कोटी मंजूर करून आणले आहेत, तसेच ३०० गटई कामगारांसाठी स्टॉल दिले असून, आणखी १३ हजारजणांना दिले जातील, असेही ते म्हणाले.

गेले ६0 वर्षे समाजाला वाऱ्यावर सोडले

या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या युवकाला शासनाने वाºयावर सोडू नये, असे दुर्वास कदम यांनी सांगितले. याचा संदर्भ घेत मंत्री खाडे यांनी गेली ५0-६0 वर्षे काहींनी समाजाला वाºयावर सोडले; पण आताच्या सरकारने समाजाला सर्व उपलब्ध करून दिले आहे, असा टोला कदम यांच्याकडे पाहून लगावला. या प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम एक एकर जागेत तीन हजार चौ. मी.मध्ये केले जाईल. त्यासाठी साडेपाच कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Police boots, belts will be made from 'Lidcom' center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.