पोलिस आयुक्तालय १ जानेवारीपासून?
By admin | Published: April 15, 2016 11:21 PM2016-04-15T23:21:04+5:302016-04-16T00:44:09+5:30
मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ : प्रस्ताव पोलिस महासंचालकांसमोर
कोल्हापूर : गुन्हेगारांसह टोळ्यांवर ‘मोक्का,’ हद्दपारीसारख्या गंभीर कारवायांचे थेट अधिकार प्राप्त व्हावेत, तसेच पोलिस प्रशासनावरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी कोल्हापुरात १ जानेवारी २०१७ पासून पोलिस आयुक्तालय सुरू करण्यासाठी गृहखात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. आयुक्तालयाचा प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समितीने आर्थिक तरतुदीसंदर्भात अहवाल दिल्यानंतर आयुक्तालयाच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याने दिली.
राज्य शासनाने नुकतेच अकोला येथे पोलिस आयुक्तालय केले आहे. महापालिका असलेल्या शहरांमध्ये पोलिस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूरलाही पोलिस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न गृहविभागाचा आहे. कोल्हापुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. या सगळ्यांचा विचार करून तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार केला. तो विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे सादर केला असता त्यांनी त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे नमूद करून तो प्रस्ताव मागे पाठविला. डॉ. शर्मा यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली झाल्याने त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावातील त्रुटींमध्ये सुधारणा केली.
नवे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हेही आयुक्तालय सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तालयाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव पोलिस महासंचालकांना सादर केला. या प्रस्तावामध्ये पोलिस आयुक्तालयासाठी नियोजित जागा म्हणून सध्याची पोलिस मुख्यालयाची नवीन इमारत देण्याचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर व इचलकरंजी शहर असे निश्चित करण्यात आले आहे. गृहविभागाकडून कोल्हापुरात दि. १ जानेवारी २०१७ पासून आयुक्तालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा प्रस्ताव पोलिस महासंचालक दीक्षित यांच्यासमोर आहे.