Kolhapur: किराणा दुकानदाराकडून १६ हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:07 IST2024-10-18T17:04:37+5:302024-10-18T17:07:03+5:30
दत्ता बिडकर हातकणंगले : कुंभोज ता. हातकणंगले येथील किराणा मालाच्या दुकानदाराकडून १६ हजार रुपयाची लाच घेताना पोलिस हवालदार रविकांत ...

Kolhapur: किराणा दुकानदाराकडून १६ हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत
दत्ता बिडकर
हातकणंगले : कुंभोज ता. हातकणंगले येथील किराणा मालाच्या दुकानदाराकडून १६ हजार रुपयाची लाच घेताना पोलिस हवालदार रविकांत भैरू शिंदे (वय. ५० रा. पांच तिकटी, हातकणंगले. मूळ गाव फणसवाडी, ता. भुदरगड) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कुंभोज येथील किराणा मालाच्या दुकानात गुटखा विक्री करतो तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी भिती घालून रविकांत शिंदे याने दुकानदाराकडे १० हजार रुपयाची मागणी केली. गेली एक महिना सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून दुकानदारांने चर्चा करून तडजोड केली. तडजोडी अंती महिना चार हजाराचा सौदा ठरला. दुकानदारांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत विभागाने पडताळणी करून आज, शुक्रवारी हातकणंगले पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. दरम्यान, १६ हजार रुपयांची घेताना रविकांत शिंदेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरिक्षक बापू साळुंखे, हवालदार सुनिल घोसाळकर, संदिप काशिद, सचिन पाटील, संदिप पवार यांच्या पथकाने केली.