पोलीस प्रशासनातर्फे ‘निर्भया’चा गौरव महिला दिन : रॅली, मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन, भेटवस्तू वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:31 AM2018-03-09T01:31:09+5:302018-03-09T01:31:09+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातर्फे ‘जागतिक महिला दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातर्फे ‘जागतिक महिला दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते निर्भया पथकातील महिला अधिकारी, पोलीस यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून रुची राणा उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, रूपाली नांगरे-पाटील, भारती मोहिते, निर्भया पथकाचे अधिकारी, वुई केअर संस्थेच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रुची राणा यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी वुई केअर समुपदेशन संस्थेतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी आभार मानले.
गुरुवारी दिवसभर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे काम महिला अधिकारी व कर्मचारी पाहत होत्या. या ठाण्यातर्फे ‘महावितरण’च्या कोल्हापूर कार्यालयातील महिलांच्या मोटारसायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांच्यासह पोलीस महिला कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी देशमुख यांनी पोलीस विभागाबाबत माहिती दिली. त्यानंतर महिला मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक संजय
मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली
झाला.
कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांची सन्मान रॅली काढण्यात आली. कोडोली हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सुहासिनीचे वाण...
जागतिक महिला दिनानिमित्त शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सुहासिनीचे वाण म्हणून साडी दिली.
हा कार्यक्रम गुरुवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाला.
शाहूपुरी, कोडोली पोलीस ठाणे यांच्यातर्फे विविध उपक्रमांनी ‘महिला दिन’ साजरा.