पोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:58+5:302021-06-04T04:19:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका ...

Police find West Bengal girl's father | पोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा

पोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका कमी बुध्यांक असलेल्या पश्चिम बंगालमधील मुलीला आला. त्या मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला फसवून कोल्हापुरात आणले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील कोळेकर यांनी प्रयत्न करून तिच्या वडिलांचा शोध लावला. सध्या ही मुलगी शासकीय वसतिगृहात असून लॉकडाऊन कमी झाल्यावर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

घडले ते असे : ही मुलगी सुमारे १८ वर्षांची आहे. ती फक्त पश्चिम बंगालमधील तिच्या गावाचे नाव सांगते. तिच्या घरी अन्वर नावाचा मुलगा येत होता. त्याच्याशी झालेल्या ओळखीतून ती त्याच्याबरोबर घरातून निघून आली. काही दिवस मुंबईत राहिली. त्या मुलाने या मुलीस कोल्हापुरात आणले आणि सोडून तो पसार झाला. काही दिवसांपूर्वी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती पोलिसांना मिळून आली. तिच्याशी संवाद साधल्यावर तिचा बुध्यांक कमी असल्याचे लक्षात आले. वयही निश्चित सांगता येत नव्हते. मतिमंद मुलांच्या शाळेत काम केलेल्या मुख्याध्यापिका स्वाती गोखले यांची मदत घेण्यात आली. त्यांनी सीपीआरकडून तिची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिचे वयही समजले. सीपीआरच्या तपासणीत तिचा बुध्यांक कमी असल्याचे स्पष्ट झाले. तिने सांगितलेल्या गावाच्या माहितीवर पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पश्चिम बंगाल पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधला व तिच्या वडिलांचा शोध लागला. मुलगी कोल्हापुरात असल्याचे समजल्यावर त्यांचाही जीव भांड्यात पडला. परंतू लॉकडाऊन असल्याने सध्या तिला न्यायला येता नसल्याने काही दिवसांसाठी या मुलीस शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.

Web Title: Police find West Bengal girl's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.