फिल्मिंग लावणाऱ्या वाहनांवर कारवाई कठोर करणार : पोलीस निरीक्षक अनिल गुजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:48 AM2019-06-25T10:48:25+5:302019-06-25T10:49:58+5:30
वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.
कोल्हापूर : वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.
वाहनांचे विंडस्क्रिन आणि खिडक्यांच्या काचांवर लावण्यात येणाºया काळ्या फिल्म काढून टाकण्याबाबत आणि अशा वाहनांवर कठोर कारवाईचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी सर्व पोलीस घटकांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात जनहित याचिकेत दिलेल्या आदेशाचे राज्यस्तरावरून पालन करण्यात येत आहे. त्यानुसार कोल्हापुरात कारवाई मोहीम राबविण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे.
महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या व्यक्तींच्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे. इतर शासकीय, निमशासकीय, खासगी वाहनांवर फिल्मिंग लावणाºया चालकांवर केंद्रीय मोटर वाहन अधिनियम १९८९ नियम १०० (२) प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात यापूर्वीही फिल्मिंग लावणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. जागेवर फिल्मिंग काढून टाकल्या जात होत्या. ही कारवाई थंडावल्यानंतर पुन्हा वाहनांना फिल्मिंग लावण्यात आले. जिल्ह्यात बहुतांशी वाहने फिल्मिंग लावून फिरताना दिसतात. शहर वाहतूक शाखेच्यावतीने ही कारवाई मोहीम कडक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गुजर यांनी सांगितले.