घरपणचे सुपुत्र पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:35+5:302021-04-30T04:31:35+5:30
कळे : पन्हाळा तालुक्यातील घरपणचे सुपुत्र व पुणे येथील विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव नानू मोळे ...
कळे : पन्हाळा तालुक्यातील घरपणचे सुपुत्र व पुणे येथील विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव नानू मोळे (वय ५८) यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. सेवानिवृत्ती केवळ एका महिन्यावर असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या अकाली निधनामुळे घरपण गावासह कळे पंचक्रोशीत शोककळा पसरली.
ते कळे पंचक्रोशीतील पहिले पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले होते. ते गावाकडे आले की युवकांना मार्गदर्शन करीत असत. ग्रामीण भागातील असूनही जिद्द, चिकाटी व मेहनतीने त्यांनी आपले ध्येय गाठले होते. अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी पोलीस दलात पुणे शहर, मुंबई, सांगली, सोलापूर या ठिकाणी सेवा बजावली. येरवडा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही त्यांनी प्रारंभीची सेवा बजावली.
सध्या ते येरवडा पोलीस ठाणेअंतर्गत विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत होते. गेल्याच आठवड्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी दुपारी उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर येरवडा (पुणे) स्मशानभूमी येथे बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलासह सर्वच क्षेत्रांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो नं. २९०४२०२१-कोल-बाजीराव मोळे (निधन)
===Photopath===
290421\29kol_3_29042021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २९०४२०२१-कोल-बाजीराव मोळे (निधन)