आरोपींच्या मोबाईल्स कॉल्सची पोलिसांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:12+5:302021-06-30T04:16:12+5:30
मुख्य सूत्रधार व्ही. पी. सिंग (दिल्ली) फरार असून त्याच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. घोडावत उद्योग ...
मुख्य सूत्रधार व्ही. पी. सिंग (दिल्ली) फरार असून त्याच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
घोडावत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संजय घोडावत त्यांचे भागीदार नीलेश बागी (बेळगाव) यांच्यासह त्यांच्या कुटुबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या रमेशकुमार प्रजापती ठक्कर (वय ५४, रा. गणेश प्रसाद सोसायटी, सिलेटर रोड, मुंबई) आणि व्ही. पी. सिंग (दिल्ली) या दोघांविरुद्ध संजय घोडावत यांनी २४ जून रोजी हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना भेटून सर्व प्रकरणाची माहिती दिली होती.
हातकणंगले पोलिसांनी या प्रकरणी एक पथक तयार करून मुंबई येथे पाठवले या पथकाने दोन दिवस रमेशकूमारवर पाळत ठेवून घोडावत यांच्या तीन प्रतिनिधींमार्फत त्यांच्याशी संपर्क करून पाच कोटी पैकी पहिला हप्ता २० लाखांचा देणेची तडजोड करून सापळा लावला. छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील हॉटेल लॉर्ज येथे रमेशकुमार पहिल्या हप्त्याचे एक लाख रुपये घेताना पोलिसानी त्याला रंगेहाथ पकडून जेरबंद केले. त्याला हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्याला इंचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रमेशकूमार ठक्कर हा मूळचा गुजरातचा असून त्यांचा साथीदार मुख्य सूत्रधार व्ही. पी. सिंग दिल्लीचा आहे. रमेशकुमार यांचे मोबाईल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे. या दोघाचे मुंबई येथील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत का, तसेच त्यांचे कोल्हापूर-सांगली, कर्नाटक, बेळगाव येथील स्थानिक टोळ्याशी लागेबांधे आहेत का, याचाही पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
चौकट
जीएसटीची कागदपत्रे कर्नाटकास देण्याची धमकी
संजय घोडावत आणि त्यांचे भागीदार नीलेश बागी (बेळगाव) यांनी कर्नाटक शासनाची जीएसटी चूकवून फसवणूक केली आहे. त्यांचे कागदोपत्री पुरावे कर्नाटक शासनाला देणेची धमकी देवून १३ ते १८ जून दरम्यान संजय घोडावत यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क करून पाच कोटीची खंडणी मागणी केली होती.
चौकट
हातकणंगले पोलीस ठाण्याकडील अतुल निकम आणि प्रकाश लाड या दोघा कर्मचाऱ्यांनी काम फत्ते केले. त्यांना दोन पंच आणि घोडावत यांचे तीन प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले.