कोल्हापूर: एनआयएने ताब्यात घेतलेल्या मुल्लाच्या संपर्कातील लोकांवर पोलिसांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 03:57 PM2022-09-24T15:57:55+5:302022-09-24T16:00:46+5:30

जिल्हाभरातील पोलीस यंत्रणाही या कारवाईनंतर सतर्क झाली आहे.

Police monitor Mullah contacts arrested by NIA, 12-day remand including five | कोल्हापूर: एनआयएने ताब्यात घेतलेल्या मुल्लाच्या संपर्कातील लोकांवर पोलिसांची नजर

कोल्हापूर: एनआयएने ताब्यात घेतलेल्या मुल्लाच्या संपर्कातील लोकांवर पोलिसांची नजर

Next

कोल्हापूर : राष्ट्रीय तपास यंत्रणादहशतवादी विरोधी पथकाने सुभाषनगरातून गुरुवारी (दि.२२) संशयित मौला नबीसाब मुल्ला याला ताब्यात घेतले होते. त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकांवर पोलिसांची नजर ठेवली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

अतिरेक्यांशी संबंध व टेरर फंडिंगशी संपर्क असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणादहशतवादी विरोधी पथकाने देशभरात छापे टाकले. त्यात १०६ जणांना अटक केली. त्यात पीएफआय संघटनेशी संबंधित असलेल्यांचा समावेश होता. कोल्हापुरातही संशयित मौला मुल्लाचाही समावेश होता. त्यांच्यासह पाचजणांना १२ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्याच्यावर स्थानिक पोलिसांची नजर होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईनंतर त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकही पोलिसांच्या रडावर आले आहेत. त्यांच्या हालचालीवर पोलिसांची खास नजर ठेवली जात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संशयित मुल्ला राहत असलेल्या सुभाषनगरातील त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाभरातील पोलीस यंत्रणाही या कारवाईनंतर सतर्क झाली आहे.

Web Title: Police monitor Mullah contacts arrested by NIA, 12-day remand including five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.