इंगळीत पोलीस पाटील, कोतवालाने घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:01+5:302021-08-01T04:24:01+5:30
आठ दिवसांपूर्वी महापुराचा फटका इंगळी गावाला बसला आहे. यामध्ये हे गाव शंभर टक्के स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे ...
आठ दिवसांपूर्वी महापुराचा फटका इंगळी गावाला बसला आहे. यामध्ये हे गाव शंभर टक्के स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे नुकसानीचे पंचनामे आणि मिळणारे अनुदान याबाबतीत ग्रामपंचायतीमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीस तलाठी पवार यांना बोलाविण्यात आले होते. तलाठी पोवार यांच्यासोबत पोलीस पाटील जावेद मुल्लाणी आणि कोतवाल चंद्रकांत जाधव हे देखील आले होते. मात्र, कोतवाल व पोलीस पाटील यांना काही सदस्यांनी या बैठकीस येण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कोतवाल आणि पोलीस पाटील यांनी एका सदस्याच्या अंगावर धावून जात इंगळी गाव पेटवण्याचा इशारा दिला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने बैठकीत वातावरण चांगलेच तापले. तलाठी पोवार यांनी शासनाच्या सूचनेनुसारच पंचनामे केले जातील अशी भूमिका मांडली व बैठक आवरती घेतली. या प्रकारानंतर इंगळी ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.