संवेदनशील १११ गावांवर पोलिसांची विशेष नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:02+5:302020-12-28T04:14:02+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. १५ जानेवारी २०२१ रोजी व दि. १८ जानेवारी रोजी निकाल होणार आहे. या ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. १५ जानेवारी २०२१ रोजी व दि. १८ जानेवारी रोजी निकाल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गटा-तटांत ईर्ष्या पराकोटीला पोहोचत आहे. ग्रामपंचायत निडणुकीसाठी एकूण ६७८ इमारतीत सुमारे १८०० मतदान केंद्रे आहेत, तर सुमारे १११ गावे संवेदशील म्हणून पोलीस खात्याने घोषित केली. संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पोलीस खात्यामार्फत स्पेशल बंदोबस्ताची आखणी होत आहे. संवेदनशील गावात वाद निर्माण होऊ नये, शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन, विशेष सूचना केल्या.
जिल्ह्यात विशेषत: गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक २१ गावे संवेदनशील आहेत. आजरा तालुक्यात एकही गाव संवेदनशील नाही, तर त्याशिवाय करवीर आणि कागल तालुक्यांतील संवेदनशील गावांवरही विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या.
संवेदनशील गावे पुढीलप्रमाणे : करवीर - गिरगाव, नंदगाव, पाटेकरवाडी, कोपार्डे, हणमंतवाडी, खुपिरे, सडोली खालसा, आरे, निगवे दुमाला, कोगे, कुडित्रे, खाटांगळे, तेरसवाडी, महे, शिये. कागल - बामणे, गोरंबे, सिद्धनेर्ली, म्हाकवे, बेलवडे खुर्द, बेलवळे बुद्रुक, साके, मौजे सांगाव.
तालुकानिहाय संवेदनशील गावांची संख्या (कंसात निवडणूक ग्रामपंचायतींची संख्या): करवीर-१५ (५४), कागल -०८ (५३), हातकणंगले -०९ (२१), गडहिंग्लज-२१ (५०), शाहूवाडी-१६ (४१), भुदरगड-१० (४५), आजरा-०० (२६), चंदगड-०५ (४१), राधानगरी - ०६ (१९), गगनबावडा-०३ (०८), शिरोळ - ०४ (३३), पन्हाळा-१४ (४२).