ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:30 PM2020-12-17T12:30:54+5:302020-12-17T12:32:19+5:30
Crimenews, Police, Kolhapur ऑनलाईन जुगार सुरू असलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विजय ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला.
कोल्हापूर : ऑनलाईन जुगार सुरू असलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विजय ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. छाप्यात पोलीस पथकाने विन गेम व विन लकी गेमच्या मालकांसह एकूण आठजणांवर गुन्हे नोंदवले. कारवाईत पोलिसांनी १५ हजारांच्या रोकडीसह सुमारे ३२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे दाखल केलेल्या संशयितांची नावे अशी : विजय शिवाजी जाधव (३७, रा. नेहरूनगर, आयसोलेशन हॉस्पिटलनजीक), अकबर नबीसो मुल्ला (३७, रा. हुंकार कॉलनी, मणेर माळ, उचगाव), परशराम खिराप्पा किटवाडकर (३२, रा. मु. चिलनवट्टी, पो. आगसगा, ता. बेळगाव, रा. बेळगाव), मंगेश लॉटरी सेंटरचे मालक वैद्य, पंकज (रा. आजरा), सरनाईक (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), विन गेमचा मालक (पूर्ण नावे नाहीत).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर मंदिरानजीकच्या विजय ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये विनापरवाना विन गेम व विन लकी गेमच्या नावाखाली ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती नूतन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे लॉटरी सेंटरच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी आठजणांवर कारवाई करून छाप्यात सुमारे १५ हजारांची रोकड व १७ हजार ४१० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा सुमारे ३२ हजारांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये संगणक, प्रिंटर, की-बोर्ड, मोबाईल संच अशा मुद्देमालाचा समावेश आहे.