सेवा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पोलिसाची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:55+5:302021-05-08T04:23:55+5:30
सेवा रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही नागरिक हे पहाटे ६ वाजल्यापासून रांगेत उभारतात. मात्र, सरकारी ...
सेवा रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही नागरिक हे पहाटे ६ वाजल्यापासून रांगेत उभारतात. मात्र, सरकारी कर्मचारी लसीकरणासाठी दुपारी ११ नंतर येतात व रांगेत न थांबता लसीकरणासाठी आग्रह धरतात. शुक्रवारी सकाळी ११ वाजता लसीकरण सुरू झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या जवळचा कर्मचारी लसीकरणासाठी आला व रांगेत न उभारता लस देण्यासाठी आग्रह करू लागला. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उमेश कदम यांनी त्या कर्मचाऱ्याला हे लोक पहाटेपासून रांगेत उभे आहेत, त्यांना पहिल्यांदा लस दिली जाईल, तुम्ही आडवे न उभारता बाजूला उभे राहा, असे सांगितले. मात्र, तो कर्मचारी ऐकत नव्हता.
थोड्यावेळाने सुरक्षारक्षकाने बाजूला उभे राहा, असे सांगताच त्या कर्मचाऱ्याचा पारा चढला. आम्ही तुमचे ४० हजार मिळवून दिलेत, हे विसरलात काय. तुम्ही काही झाले तरी बंदोबस्त आमच्याकडेच मागणार आहात, तेव्हा बघू, अशी धमकीच दिली.