गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:50 PM2017-09-04T12:50:46+5:302017-09-04T12:50:56+5:30

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सोमवारी रात्री आठ पासून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गांवर प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांसह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत.

Police ready to immerse Ganesh | गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज

गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज

Next

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री आठ पासून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गांवर प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांसह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. चौका-चौकांत, गल्ली-बोळांत पोलीस असल्याने कोल्हापूर  शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक संजय मोहिते हे संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहेत.


सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत आहे. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालय येथे सोमवारी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव आदींनी बंदोबस्तास असणाºया पोलिसांना मार्गदर्शन केले. तसेच स्वत: पोलीस अधीक्षक मोहिते यांनी मिरवणूक मार्गांवरील जागेची दूसºयांदा पाहणी केली.

मिरवणुकीचा मुख्य मार्ग मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, गंगावेश, जामदार क्लबमार्गे पंचगंगा घाट असा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे साध्या वेशात पोलिसांची गस्त असणार आहे. तसेच विविध ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक नागरिकाची हालचाल टिपणार आहेत.

उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोºयांवरूनही दुर्बिणीच्या साहाय्याने पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. संवेदनशील ठिकाणी शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मद्यप्यांवर कठोर कारवाई


प्रत्येक चौकात ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर करण्यात आला असून, दारू पिऊन अथवा मादक द्रव्ये सेवन करून, घेऊन येणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. हुल्लडबाज व टवाळखोर व्यक्तींकडून महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांचे छेडछाडविरोधी पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी चौकाचौकांत तंबू उभे केले आहेत.

असा आहे पोलीस बंदोबस्त


पोलीस अधीक्षक - १
अप्पर पोलीस अधीक्षक - २
पोलीस उपअधीक्षक - ६
पोलीस निरीक्षक - २९
पोलीस उपनिरीक्षक -१०४
पोलीस कर्मचारी (पुरुष-महिला) - २२००
होमगार्ड (पुरुष) -१०००
होमगार्ड (महिला)- २००
ध्वनिमापन अधिकारी व कर्मचारी (प्रदूषण मंडळ) - ८
बे्रथ अ‍ॅनालायझर मशीनकरिता कर्मचारी- ३
बॉम्ब शोधपथक, व्हिडिओ कॅमेरा, टेहळणी पथक


इतर जिल्'ांतील पोलीस


पोलीस निरीक्षक -४
सहायक पोलीस निरीक्षक - ९
जलद कृती दल तुकडी - १४०
राज्य राखीव दलाची तुकडी २ - (६०)
 

Web Title: Police ready to immerse Ganesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.