morcha Kolhapur : मोदी यांचा पुतळा दहन करताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:25 PM2021-05-26T19:25:01+5:302021-05-26T19:27:20+5:30

morcha Kolhapur : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसांनी सकाळपासून कडे केले होते. शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या पक्षांच्यावतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | morcha Kolhapur : मोदी यांचा पुतळा दहन करताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

morcha Kolhapur : मोदी यांचा पुतळा दहन करताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

Next
ठळक मुद्देशिवसेना, दोन्ही कॉंग्रेस, डाव्यांची निदर्शने बिंदू चौकात वातावरण तंग, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसांनी सकाळपासून कडे केले होते. शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या पक्षांच्यावतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असून, त्याला बुधवारी (दि. २६) सहा महिने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन सात वर्षे पूर्ण झाली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी विविध बारा पक्षांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकाला कडे केले होते. जसजसे आंदोलनकर्ते येऊ लागले तसे पोलिसांनी अधिकच कडे केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरु असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या गाडीतून पुतळा आणण्यात आला. यावेळी भाषणे थांबवून सगळेच गाडीकडे पळत सुटल्याने पोलीस यंत्रणा चांगलीच हडबडली. पोलिसांनी गाडीसभोवती घेराओ घालत गाडीतून पुतळा काढून घेतला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

यावेळी माकपचे चंद्रकांत यादव, ॲड. गुलाबराव घोरपडे, सतीशचंद्र कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. अतुल दिघे, दिलीप पवार, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, संभाजीराव जगदाळे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, संदीप देसाई, कुमार जाधव, राजू जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी... किसान विरोधी घोषणा

पोलिसांनी पुतळा काढून घेतल्यानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचा निषेध नोंदवत नरेंद्र मोदी... किसान विरोधी या घोषणांनी बिंदू चौक दणाणून सोडला.

Web Title: Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.