पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेचे दागिने केले लंपास, गारगोटीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:34 AM2022-04-15T11:34:12+5:302022-04-15T11:34:39+5:30
गारगोटी : आपण साध्या वेशातील पोलीस असून, सोन्याच्या बांगड्या पिशवीत काढून ठेवा, असे सांगून वृद्ध स्त्रीचे अज्ञात चोरट्यांनी दोन ...
गारगोटी : आपण साध्या वेशातील पोलीस असून, सोन्याच्या बांगड्या पिशवीत काढून ठेवा, असे सांगून वृद्ध स्त्रीचे अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केले. याबाबतची फिर्याद शोभा मारुती सावंत (वय ६८, रा. साई कॉलनी, गल्ली नं. २, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.
अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.१४) रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गारगोटी एस.टी.स्टॅण्डशेजारी असलेल्या भारत बेकरीसमोर शोभा सावंत या आल्या असताना दोन अनोळखी अज्ञात चोरट्यांनी त्यांना आपण साध्या वेशातील पोलीस असून, पुढे पोलीस तपासणी करीत आहेत. आपण आपल्या बांगड्या काढून पिशवीत ठेवा, असे सांगून त्यातील एकाने त्या बांगड्या कागदात गुंडाळताना हातचलाखी करून बनावट बांगड्या त्या कागदात गुंडाळल्या. चार तोळे वजनाच्या दोन लाख रुपये किमतीच्या बांगड्या चोरीस गेल्या. अधिक तपास भुदरगड पोलीस करीत आहेत.