पोलिसांकडून ५ हजार वाहने जप्त; दीड कोटीचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:40+5:302021-05-14T04:24:40+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत दि. ४ एप्रिल ते १२ मे या कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत दि. ४ एप्रिल ते १२ मे या कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचे केली आहे. या कालावधीत तब्बल पाच हजार वाहनांवर जप्तीची कारवाई केली, तर ६१ हजार ८६५ दुचाकीवर मोटार व्हेइकल ॲक्टनुसार गुन्हे नोंदवले. याप्रकरणी सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. विनामास्कप्रकरणी १६ हजार ३४१ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत सुमारे ३४ लाख ६४ हजार ५०० इतका दंड वसूल केला.
दरम्यान, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात २२१ दुचाकी जप्त केल्या. तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २२४४ वाहनांवर गुन्हे नोंदवले. तर २ लाख ७२ हजार ९०० रुपये दंड आकारला. तर पोलीस व महापालिकेच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून विनामास्क फिरणाऱ्या ५३३ जणांना ७६ हजार ३०० रुपये दंड आकारला.