पोलिसांची लाचेशिवाय कामे होत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:53+5:302021-02-13T04:23:53+5:30

कोडोली येथे संशयितांवर कारवाई करण्यासाठी अनेकांना मदतीची भूमिका घेतली होती. हीच व्यक्ती वादग्रस्त होती. एका सहकाऱ्याने कल्पना दिली होती. ...

Police work is not done without bribe | पोलिसांची लाचेशिवाय कामे होत नाहीत

पोलिसांची लाचेशिवाय कामे होत नाहीत

Next

कोडोली येथे संशयितांवर कारवाई करण्यासाठी अनेकांना मदतीची भूमिका घेतली होती. हीच व्यक्ती वादग्रस्त होती. एका सहकाऱ्याने कल्पना दिली होती. वादग्रस्त व्यक्तीचा यामध्ये सहभागी आहे. या सल्लाकडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ऊर्फ राजू भोसले यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना लॉकअपमध्ये बसण्याची वेळ आली. वडगाव पोलीस ठाणे हे संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे टिकण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक जण नोकरी शाबूत ठेवण्याची धडपड तर अनेकांची मिळकतीकडे ओढ असते, हे वास्तव आहे. यामध्ये लाच घेताना सापडला की आरोपी होतो. तर न सापडलेले संत ही वस्तुस्थिती असते. या पार्श्वभूमीवर शहरात अलीकडील काळातील लाच घेताना दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे. तर जिल्ह्यातील ही आठवड्यातील चौथी घटना आहे. या घटना सातत्याने घडत आहेत. याकडे लोकसेवकांनी बोध घेतल्याचे दिसून येत नाही. येथील काही जण आपण मालक झाल्याच्या थाटात वागत आहेत. ही पिळवणूक होत असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केल्यामुळे जाळ्यात सापडत आहेत. भोसले यांच्यावर कारवाई म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ या म्हणीप्रमाणेच असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात होते.

Web Title: Police work is not done without bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.