जिल्ह्यात ३ लाख २३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 02:27 PM2021-01-30T14:27:56+5:302021-01-30T14:29:55+5:30

Polio dose Kolhapur- याआधी स्थगित करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम उद्या, रविवारी ३१ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील ३ लाख २३ हजार ५४६ बालकांना डोस देण्यात येणार आहे.

Polio dose to 3 lakh 23 thousand children in the district | जिल्ह्यात ३ लाख २३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार

जिल्ह्यात ३ लाख २३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ३ लाख २३ हजार बालकांना पोलिओ डोस११८ आरोग्य संस्थांचे ६४४७ अधिकारी, कर्मचारी मोहिमेत

कोल्हापूर : याआधी स्थगित करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम उद्या, रविवारी ३१ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील ३ लाख २३ हजार ५४६ बालकांना डोस देण्यात येणार आहे.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील २४१६ बुथवर डोस दिले जाणार आहेत. यासाठी ६४४७ आरोग्यसेवक, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी नियोजनामध्ये आहेत. ७०६ मोबाईल पथके असून ऊस कामगारांच्या वस्तीपासून ते रस्त्याची कामे करणाऱ्यांच्या पालापर्यंत ही पथके जाऊन डोस देणार आहेत. २९७ ट्राझिंट पथके असून रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर ती तैनात करण्यात येतील.

डोस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून ३०९६ पथकांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून कोणाला डोस मिळाला नसेल तर त्याची खात्री करून तो देण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
 

  • कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील लाभार्थी बालके ४८,६३८
  • नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थी ५३,८४६
  • ग्रामीण भागातील लाभार्थी २,२१,०६२
  • एकूण ३, २३,५४६


पल्स पोलिओ मोहिमेची तयारी झाली असून डोसही शीतकरण साखळीतून पोहोच करण्यात येत आहेत. पालकांनी रविवारी न चुकता आपल्या बालकांना डोस देऊन त्यांच्या आरोग्याबाबत पूर्वदक्षता घ्यावी.
डॉ. योगेश साळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषद

Web Title: Polio dose to 3 lakh 23 thousand children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.