शिरोळमध्ये राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:40 AM2017-09-25T00:40:48+5:302017-09-25T00:40:48+5:30

Political atmosphere erupted in Shirol | शिरोळमध्ये राजकीय वातावरण तापले

शिरोळमध्ये राजकीय वातावरण तापले

Next



संदीप बावचे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीची कमान ताब्यात ठेवण्यासाठी गावागावांत कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने या पदाच्या उमेदवारांचा कस लागणार आहे. त्यामुळे मतदारांना चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.
शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सतरा पैकी अब्दुललाट व लाटवाडीची निवडणूक २७ आॅक्टोबरला होत आहे. औरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या पंधरा ग्रामपंचायतींची निवडणूक १६ आॅक्टोबरला होत आहे.
पंधरा ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामात पावसाच्या मोसमात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाने राजकीय वातावरण तापले आहे. गावागावांत सरपंचपदासाठी डावपेच आखले जात असून, स्थानिक गट-तट पातळीवर या निवडणुका होत असल्याने नेत्यांनी रणनीती अद्याप उघड केलेली दिसत नाही. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुकांची तहसील कार्यालयावर गर्दी होत आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट गावामधून होणार असल्याने चुरस दिसत आहे.

Web Title: Political atmosphere erupted in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.