दादांच्या ‘गडहिंग्लज दौºया’मुळे राजकीय खळबळ राज्यातही टाकली ‘गुगली’ : श्रीपतराव शिंदे यांच्या घरी घेतले स्नेहभोजन---कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:29 AM2018-01-31T00:29:34+5:302018-01-31T00:30:48+5:30

गडहिंग्लज : गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवसांत दोनवेळा गडहिंग्लजला येऊन गेले. एवढेच नव्हे, तर दुसºयावेळी त्यांनी आवर्जून जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे

Political excitement by the 'Gadhinglaje tour' of the grandfathers in the state 'Gugali': Snrhojan taken at home of Shriptev Shinde - because of politics | दादांच्या ‘गडहिंग्लज दौºया’मुळे राजकीय खळबळ राज्यातही टाकली ‘गुगली’ : श्रीपतराव शिंदे यांच्या घरी घेतले स्नेहभोजन---कारण राजकारण

दादांच्या ‘गडहिंग्लज दौºया’मुळे राजकीय खळबळ राज्यातही टाकली ‘गुगली’ : श्रीपतराव शिंदे यांच्या घरी घेतले स्नेहभोजन---कारण राजकारण

Next

राम मगदूम।
गडहिंग्लज : गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवसांत दोनवेळा गडहिंग्लजला येऊन गेले. एवढेच नव्हे, तर दुसºयावेळी त्यांनी आवर्जून जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांच्या घरी स्नेहभोजनही घेतले. म्हणूनच केवळ ‘गडहिंग्लज-कागल’मध्येच नव्हे, तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. किंबहुना, ‘शिंदे’शी जवळीकता वाढवून त्यांनी राज्याच्या राजकारणातही ‘गुगली’ टाकली आहे.

त्याची कारणेही तशीच आहेत. राज्यात भाजपा सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषदेसह इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले; परंतु गडहिंग्लज, आजरा व चंदगडमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. आजºयाचे अशोक चराटी वगळता पक्षाला बळकटी देऊ शकेल, असा एकही प्रबळ पुढारी गडहिंग्लज विभागात भाजपाला अजूनही सापडलेला नाही. त्यामुळेच दादांच्या गडहिंग्लज दौºयाची जिल्हाभर चर्चा आहे.

अडीच वर्षांपूर्वी शिंदेच्या कार्यक्रमासाठी दादा नूलमध्ये येऊन गेले होते. वर्षापूर्वी ‘शहापूरकर-चव्हाण’ यांच्या भाजपा प्रवेशावेळी आणि परवा शिंदेचे जावई महेश कोरी यांच्या ‘व्हाईस आॅफ गडहिंग्लज’ कार्यक्रमाच्या निमित्ताने व त्यानंतर सुनील शिंत्रे यांच्या ‘पाणी परिषदे’च्या निमित्ताने ते गडहिंग्लजला येऊन गेले; परंतु दरम्यानच्या निवडणुका व बदलत्या राजकीय घडामोडींवरूनच त्यांच्या दौºयाची कारणमीमांसा करायला हवी.

दोन वर्षांपूर्वी झालेली गडहिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक शिंदेच्याबरोबरच लढविण्याची दादांची इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले; पण घडले उलटेच. मुश्रीफांनी शिंदेशी युती जमविली. त्यानंतर गडहिंग्लज पालिकेत ‘जनता दल-राष्ट्रवादी’ किंवा ‘जनता दल-भाजपा’ एकत्र येईल, अशी चर्चा सुरू असतानाच शिंदेनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली.स्व:बळावर त्यांनी पालिकेची, तर मुश्रीफांच्या मदतीने कारखान्याची सत्ता मिळविली आणि वयाची ‘ऐंशी’ ओलांडल्यानंतरही गडहिंग्लजच्या राजकारणावरील आपली पकड मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

म्हणूनच दादांचे गडहिेंग्लजकडे लक्ष
महिन्यापूर्वीच त्यांनी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टींना बोलावून आपल्या नेतृत्वाखालील लक्ष्मी सेवा संस्थेचा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यावेळी ‘शेट्टी-शिंदे’ दोघांनीही भाजपाच्या विरोधातील सूर जोरात आळवला. नव्या राजकीय क्रांतीची सुरुवात ‘गडहिंग्लज’मधूनच होईल असे सांगत ‘पुरोगामी गडहिंग्लज’करांना सहकार्याची सादही घातली. त्यामुळेच ‘दादांनी’ही ‘गडहिंग्लज’वर लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा आहे.

‘खोराटे’, ‘गाठ’नंतर..शिंदे ?
जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव खोराटे यांनी ‘बिद्री’च्या निवडणुकीत भाजपाशी समझोता करून कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळविले, तर पूर्वाश्रमीच्या जनता दलाच्या महावीर गाठ यांनी भाजपाच्या तिकिटावर पत्नी जयश्रीतार्इंना ‘हुपरी’च्या पहिल्या नगराध्यक्षपदी विराजमान केले. त्यामुळे आता ‘चंदगड’ आणि ‘कागल’ विधानसभा मतदारसंघात ‘शिंदे’ कोणती भूमिका घेणार? याकडेच ‘जिल्ह्याचे’ लक्ष लागले आहे.
अमल महाडिक ‘समन्वयक’!

चार महिन्यांपूर्वी गडहिंग्लज पालिकेच्या एका बागेच्या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून जि. प.च्या अध्यक्षा शौमिका महाडिक आल्या होत्या. त्याचवेळी कारखान्याच्या निवडणुकीत निर्माण झालेला ‘शिंदे व चंद्रकांतदादा’ यांच्यातील दुरावा कमी करण्यात समन्वयकाची भूमिका अमल महाडिक यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट झाले होते. परवाच्या ‘व्हाईस आॅफ गडहिंग्लज’ कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Web Title: Political excitement by the 'Gadhinglaje tour' of the grandfathers in the state 'Gugali': Snrhojan taken at home of Shriptev Shinde - because of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.