राजीनाम्यावरूनराजकीय पेच ! राजीनामा न दिल्यास माळवींवर कारवाई : पोवार

By Admin | Published: February 16, 2015 12:39 AM2015-02-16T00:39:06+5:302015-02-16T00:39:18+5:30

महापालिकेची आज सभा : इतरांनी दिलेले पत्र स्वीकारू नका; माळवींची प्रशासनाला विनंती

Political scandal Action against Malavis if he does not resign: Powar | राजीनाम्यावरूनराजकीय पेच ! राजीनामा न दिल्यास माळवींवर कारवाई : पोवार

राजीनाम्यावरूनराजकीय पेच ! राजीनामा न दिल्यास माळवींवर कारवाई : पोवार

googlenewsNext

कोल्हापूर : लाचप्रकरणात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी सोमवारी होणाऱ्या महापालिके च्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून राजीनामा न दिल्यास पक्ष त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांनी रविवारी सांगितले.महापौर माळवी या ३० जानेवारील १६ हजारांची लाच घेतल्याच्या संशयावरून पोलिसांच्या कचाट्यात सापडल्या. राष्ट्रवादीच्या राज्य ते जिल्हास्तरावरील सर्वच नेत्यांनी त्यांचा राजीनामा अटळ असल्याचे सांगितले. राजीनाम्यासाठी ९ फेब्रुवारीला सभेचे आयोजनही केले. राजीनामा न देताच सभा झाली त्यानंतर राजीनाम्यासाठी १६ फेबु्रवारीचा मुहूर्त ठरला. मात्र या सभेला अनुपस्थित राहणार असल्याचे पत्र प्रशासनाला माळवी यांनी दिले आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छुक नगरसेवकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही गोची झाली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे जिल्ह्णातील सर्वच नेते महापौर माळवी यांना पद देण्यासाठी आग्रह करणाऱ्यांच्या संपर्कात होते. ‘उद्याच्या सभेला महापौर येतील काळजी करू नका’, असा निरोप माळवींना महापौर करण्यासाठी आग्रह असणाऱ्या प्रमुख दोघांनीही दिल्याचे . पोवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र, दोनवेळा पक्षनेतृत्वाला राजीनाम्याबाबत चकवा देण्यात यशस्वी झालेल्या तृप्ती माळवी उद्याच्या सभेला येतील याची खात्री राष्ट्रवादीतील एकाही नेत्यास नाही. (प्रतिनिधी)

इच्छुकांचे ‘देव पाण्यात’!
महापौरपदासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडे इच्छुकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. माळवींनी राजीनामा द्यावा यासाठी या इच्छुकांनी अक्षरश: ‘देव पाण्यात’ घातले आहेत. एकूणच महापौरांच्या राजीनाम्यावरून दोन्ही पक्षांत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजीनामानाट्य कोणते वळण घेणार?
महापौर माळवी यांनी राजीनामा न दिल्यास राष्ट्रवादीतील एक गट त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेणार आहे. शिवसेना व भाजपने तर महापौरांविरोधात मोर्चाच उघडला आहे. महापौरपद डावलले गेल्याने चिडलेले कॉँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक होणार, अशा स्थितीत माळवींचे राजीनामानाट्य उद्या कोणते वळण घेणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.


महापालिका वर्तुळात रंगल्या पैजा
महापौरपदावरून सन्मानानेच पायउतार होणार असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांच्या राजीनाम्यावरुन नगरसेवकांत मात्र, पैजा रंगल्या आहेत.महापालिकेच्या गेल्या सभेतही महापौर राजीनामा देणार किंवा नाही याबाबत पैजा लागल्या होत्या. या पैजा जिंकणारे व हारणारे आता पुन्हा नव्याने पैजा लावत आहेत. दबक्या आवाजात अंदाज-आराखडे बांधले जात आहेत.





कोल्हापूर : रंकाळा संवर्धनाचे निमित्त करून महापौरांचा राजीनामा घेण्यासाठी आज, सोमवार महापालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेत महापौर राजीनामा देणार की नाही? याकडे समस्त कोल्हापूरवासीयांचे लक्ष लागले असतानाच तृप्ती माळवी यांनी मात्र, राजीनामा न देण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी होणार असून महापालिकेत राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘महापालिकेच्या आज होणाऱ्या सभेस अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. पदाचा कोणताही राजीनामा कोणाकडेही दिलेला नाही. अन्य मार्गाने आलेला कोणताही राजीनामा ग्राह्य धरू नये,’ असे पत्र महापौर तृप्ती माळवी यांनी प्रशासनास दिले आहे. त्यामुळे उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा होण्याची शक्यता आहे. महापौरांनी राजीनामा न दिल्यास काय होणार? याचेही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. माळवी महापौर पदावर कायम रहाव्यात यासाठी प्रयत्न करणारे पडद्यामागचे सुत्रधार पुढे येणार का? की, महापालिकेत माळवी यांना एकाकी पाडले जाणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. / आणखी वृत्त पान ७


राजीनामा नाहीच !
महापौरांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्यांच्यावर सोपविली आहे. त्यांची महापौर तृप्ती माळवी यांनी रविवारी दुपारी भेट घेतली. लाच प्रकरणात नाहक गुंतविले आहे. या प्रकरणातून पूर्णपणे मुक्त झाल्याखेरीज राजीनामा देणार नाही, असे स्पष्टीकरण माळवी यांनी त्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत महापौर माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

राष्ट्रवादीचे
‘वेट अ‍ॅन्ड वॉच’
महापौर माळवी यांचा ठरलेल्या वेळेत राजीनामा होईल. त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा न दिल्यास पक्ष त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी पक्षातर्फे याबाबत सोमवारी घडणाऱ्या घडामोडी पाहूनच सोमवारी सविस्तर प्रतिक्रिया देऊ.
- आर. के . पोवार,
(शहराध्यक्ष, राष्ट्रवादी)

Web Title: Political scandal Action against Malavis if he does not resign: Powar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.