दोन-अडीचशे घराण्यांपलीकडे राजकारण न्यायचे आहे: राजू शेट्टी; दोन्हीकडे तीच-तीच माणसे दिसतात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 08:27 AM2024-10-08T08:27:21+5:302024-10-08T08:27:41+5:30
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते. ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले की, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळे इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ दोन, अडीचशे घराण्यांमध्येच सुरू आहे. त्यापलीकडे सामान्य; परंतु नेतृत्व करू शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन आम्हाला या घराण्यापलीकडे राजकारण न्यायचे आहे. आघाडी आणि युती आलटून-पालटून दोन्हीकडे तीच-तीच माणसे दिसतात. त्यामुळेच आम्ही हा तिसरा पर्याय काढला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षाच्या उसाला अजूनही २०० रुपये मिळावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायचे असताना बॉयलर पेटले आहेत. नियमाप्रमाणे रोज प्रतिटन ५०० रुपयंचा दंड वसूल केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘त्यांना तिकडेही शांत झोप लागायला हरकत नाही’
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते आणि ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळे इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही, असे शेट्टी म्हणाले.