शिवाजी पेठेतील राजकारणास कलाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:38+5:302021-02-09T04:25:38+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणास गेल्या दोन दिवसांत शिवाजी पेठेत कलाटणी मिळाली. ज्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, ...

Politics in Shivaji Peth | शिवाजी पेठेतील राजकारणास कलाटणी

शिवाजी पेठेतील राजकारणास कलाटणी

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणास गेल्या दोन दिवसांत शिवाजी पेठेत कलाटणी मिळाली. ज्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, त्या यशोदा प्रकाश मोहिते आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत. विशेष म्हणजे आधी उमेदवारी जाहीर झालेल्या माजी महापौर सुनीता अजित राऊत यांनी त्यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली.

माजी महापौर सुनीता अजित राऊत या त्यांच्या हक्काच्या ‘पद‌्माराजे उद्यान’ येथून निवडणूक लढविणार होत्या. परंतु त्याठिकाणी अर्चना उत्तम कोराणे यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे पेच निर्माण झाला. त्यातून मग झालेल्या चर्चेतून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर तडजोडी झाल्या आणि कोराणे यांनी ‘पद्माराजे’ प्रभागातून, तर सुनीता राऊत यांनी नजिकच्या ‘संभाजीनगर बसस्थानक’ प्रभागातून लढण्याचा निर्णय झाला. दोघींची उमेदवारीही मुश्रीफ यांनी जाहीर केली.

परंतु गेल्या दोन दिवसांपासून शिवाजी पेठेतील राजकारणास वेगळीच कलाटणी मिळाली. गतवर्षी भाजपकडून लढलेल्या यशोदा मोहिते यांनी संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून काँग्रेसने उमेदवारी देतो म्हणून सांगिले होते. त्यामुळे त्याही द्विधा मनस्थितीत होत्या. परंतु दोन दिवसात मोहिते यांनी सुनीता राऊत यांनी थांबून आपणास पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याची तयारी दाखविली. तशी विनंती मोहिते यांनी राऊत यांच्याकडे केली होती. त्यामुळे माघार घेण्यास राऊत तयार झाल्या.

- राऊत यांना खात्री नव्हती?-

राष्ट्रवादीकडून झालेल्या सर्वेक्षणात सुनीता राऊत यांचा टिकाव लागायचा असेल, तर खूप मजल मारावी लागेल, असा निष्कर्ष प्राप्त झाला होता. त्यामुळे आपली एक जागा गमावण्यापेक्षा यशोदा मोहिते यांनाच उमेदवारी देऊया, असा निर्णय राऊत-कोराणे यांनी घेतला आणि तो मंत्री मुश्रीफ यांच्या कानावर घातला. त्यास त्यांनी मान्यता दिली.

- पुनर्वसन करण्याचा शब्द -

कोराणे, मोहिते यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता अजित राऊत व सुनीता राऊत यांच्यावर पक्षाने सोपविली आहे. त्याच्या बदल्यात आपले योग्य पुनर्वसन करण्याचा शब्द मंत्री मुश्रीफ यांनी दिला असल्याचे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Politics in Shivaji Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.