जिल्हा बँकेसाठी पाच मे रोजी २६ केंद्रांवर मतदान

By admin | Published: April 29, 2015 01:02 AM2015-04-29T01:02:46+5:302015-04-29T01:03:04+5:30

सात मे रोजी मतमोजणी : पहिल्यांदाच तालुका पातळीवर निवडणुका; प्रचाराची रंगत वाढली

Polling on 26 centers at District Bank on May 5 | जिल्हा बँकेसाठी पाच मे रोजी २६ केंद्रांवर मतदान

जिल्हा बँकेसाठी पाच मे रोजी २६ केंद्रांवर मतदान

Next

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेसाठी ५ मे रोजी २६ केंद्रांवर मतदान होणार आहे. पहिल्यांदाच तालुका पातळीवर निवडणुका होणार असल्याने मतदारांवर ताण येणार नाही. जिल्हा बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले. विकास सेवा संस्था गटात करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले हे चार तालुके बिनविरोध झाले; पण उर्वरित ठिकाणी अर्ज राहिले असून कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य यांचे राजर्षी शाहू शेतकरी पॅनेल, तर शिवसेना-भाजप यांनीही राखीव गटातील सात जागांसाठी पॅनेल उभे केले आहे. कागल, शिरोळ, शाहूवाडी, भुदरगड, चंदगड, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लजमध्ये विकास संस्था गटांत दुरंगी लढत होत आहे. पारंपरिक विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. दोन्ही पॅनेलसह अपक्षांनी प्रचारयंत्रणा राबविली असून, मंगळवारी (दि. ५) मतदान होत आहे. मतमोजणी ७ मे रोजी सकाळी आठपासून शासकीय महसूल बहुउद्देशीय हॉल, रमणमळा येथे आहे.

शाहू शेतकरी आघाडीचा आज मेळावा
कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य पक्षाच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा मेळावा आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता महासैनिक दरबार हॉल येथे होत आहे. या मेळाव्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
भाजप-शिवसेनेचा शुक्रवारी मेळावा
जिल्हा बॅँकेच्या निवडणूक प्रचारार्थ भाजप व शिवसेनाप्रणीत छत्रपती शाहू परिवर्तन पॅनेलचा मेळावा शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी (दि. १) सकाळी अकरा वाजता होणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस बाबा देसाई यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे.

Web Title: Polling on 26 centers at District Bank on May 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.