कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी ईर्ष्येने ८७.५५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:38 AM2018-05-28T00:38:08+5:302018-05-28T00:38:08+5:30

Polling in 87.55 percent voting for the Gram Panchayat in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी ईर्ष्येने ८७.५५ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी ईर्ष्येने ८७.५५ टक्के मतदान

Next


कोल्हापूर : राजकीय ईर्ष्या... एक-एक मत आणण्यासाठी सुरू असलेली कार्यकर्त्यांची चढाओढ... अशा चुरशीच्या वातावरणात जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी टक्के इतके मतदान झाले. एकूण ९२ हजार ९९४ मतदारांपैकी ८१ हजार ४२० मतदारांनी आपला हक्क बजावला; तर ११ ग्रामपंचायतींच्या १२ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ८०.८२ टक्के मतदान होऊन ९ हजार २८४ पैकी ७ हजार ५०३ जणांनी मतदान केले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गारगोटी येथे ८०.४० टक्के, तर राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे ८६.३५ टक्के मतदान झाले. आज, सोमवारी सकाळी १० पासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. शेतीकामाची घाई असल्याने सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी बहुतांश केंद्रांवर गर्दी दिसत होती. सकाळी ११.३० पर्यंत जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी ४०.४६ टक्के मतदान झाले. यामध्ये एकूण ९२ हजार ९९४ मतदारांपैकी ३७ हजार ८०७ मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानावेळी कमालीची चुरस दिसत होती. मतदान केंद्रांबाहेर उमेदवार व त्यांचे समर्थक थांबून होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत ८७.५५ टक्के मतदान झाले. एकूण ९२ हजार ९९४ मतदारांपैकी ८१ हजार ४२० मतदारांनी आपला हक्क बजावला. गारगोटी, सरवडे, कसबा वाळवे, बहिरेश्वर, पेरणोली, कसबा ठाणे अशा प्रमुख गावांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होेते. यामध्ये गारगोटी येथे ८०.४० टक्के मतदान होऊन ९ हजार ७६ मतदारांनी, तर सरवडे येथे ८६.३५ टक्के मतदान होऊन ५ हजार १०४ मतदारांनी मतदान केले.
पोटनिवडणुकीसाठीही
उत्साहाने मतदान
पन्हाळा तालुक्यातील २ जागांसाठी १३२७ मतदान होऊन ८६.२२ टक्के, शाहूवाडीतील एका जागेसाठी ९८० मतदान होऊन ८२.०१ टक्के, हातकणंगलेतील एका जागेसाठी ७०७ मतदान होऊन ८१.३६ टक्के, शिरोळ तालुक्यातील दोन जागांसाठी २००३ मतदान होऊन ८२.१६ टक्के, करवीर तालुक्यातील तीन जागांसाठी ७०७ मतदान होऊन ८८.१५ टक्के, कागल तालुक्यातील दोन जागांसाठी १४५७ मतदान होऊन ७२.८९ टक्के, चंदगड तालुक्यातील एका जागेसाठी ३२२ मतदान होऊन ७२.८५ टक्के इतके मतदान झाले.
येथे होणार मतमोजणी
मतमोजणी आज, सोमवारी सकाळी १० पासून सुरू होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तालुकानिहाय ठिकाणे निश्चित केली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील मतमोजणी तहसीलदार कार्यालयाशेजारील जुने शासकीय धान्य गोदाम येथे, पन्हाळ्यातील मयूरबाग येथील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉल येथे, हातकणंगलेची तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखा येथे, शिरोळची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा पहिला मजला येथे, करवीरची कसबा बावडा, रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे, राधानगरीची तहसीलदार कार्यालयाच्या मीटिंग हॉल येथे, कागलची तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक विभाग येथे, भुदरगडची गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या तालुका क्रीडासंकुल येथे, आजऱ्याची नवीन प्रशासकीय इमारत येथे, चंदगडची जुन्या तहसीलदार कार्यालयाची इमारत येथे मतमोजणी होणार आहे.
राधानगरी तालुक्यात ९२.६० टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ९२.६० टक्के मतदान शांततेत पार पडले. सर्वाधिक मतदान चक्रेश्वरवाडीत (९८.४५ टक्के) झाले. किरकोळ वादावादी वगळता तालुक्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. गावनिहाय मतदान, झालेले मतदान व कंसातील आकडे मतदानाची टक्केवारी : फेजीवडे १८७३ पैकी १७२५ (९२.१०), कसबा वाळवे ५४०४ पैकी ४६२९ (८९.२७), चक्रेश्वरवाडी ९६६ पैकी ९५१(९८.४५), सरवडे ५९११पैकी ५०१४ (८६.३५), मालवे ८४४ पैकी ७८१ (९२.५४), बारडवाडी १६८४ पैकी १६२६ (९६.५६), पालकरवाडी ८७८ पैकी ८३७ (९५.३३), फराळे १५३३ पैकी १४३२ (९२.२१), चांदेकरवाडी १३८८ पैकी १२५८(९०.६३).
भुदरगड तालुक्यात सरासरी ८२.६३ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटीसह सहा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सरासरी ८२.६३ टक्के मतदान झाले. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गारगोटी ग्रामपंचायतीसाठी ८०.४० टक्के मतदान झाले. गारगोटीतील मतदान केंद्रावरील किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान झाले. तर दुपारी दीड वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजेपर्यंत ७२ टक्के मतदान झाले होते.
तालुक्यातील गारगोटी, शिंदेवाडी, हणबरवाडी, निष्णप, चांदमवाडी, कोंडोशी या सहा ग्रामपंचायतीसाठी १२ हजार ७८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६ हजार ५५८ पुरुष मतदारांनी तर ६ हजार २२६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गारगोटीतील १७ मतदान केंद्रावर मतदान झाले. सायंकाळच्या वेळात केंद्रावर गर्दी होती.

Web Title: Polling in 87.55 percent voting for the Gram Panchayat in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.