kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 10:52 AM2022-01-05T10:52:04+5:302022-01-05T10:59:40+5:30

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली आहे.

Polling for Kolhapur District Central Co operative Bank today | kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद

kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली आहे. आजऱ्यात सेवा संस्था गटातील अशोक चराटी गटाच्या मतदारांनी गुलाबी फेटे बांधून मतदानाचा हक्क बजाविला. महाविकास आघाडीचे सुधीर देसाई यांच्या ठराव धारकांनी मतदानासाठी रांग लावली होती. आजऱ्यात सेवा संस्था गटातील 107 पैकी 106 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

तर, शिरोळमध्ये सेवा संस्था गटातील 149 पैकी 90 जणांनी मतदान केले आहे. कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील मतदान प्रतिभा नगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेत होत आहे. जिल्ह्यातील 40 केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून, दुरंगी लढत होत आहे. विकास संस्था गटातील सहा व इतर गटातील नऊ अशा 15 जागांसाठी निवडणूक लागली आहे. सत्तारूढ व परिवर्तन पॅनलमध्ये निकराची लढाई पाहावयास मिळत आहे. गेले पंधरा दिवस जिल्ह्यात प्रचाराची अक्षरश: राळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले होते.

‘कागल’ विकास संस्था गटातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गगनबावड्यातून पालकमंत्री सतेज पाटील, करवीरमधून आमदार पी. एन. पाटील, चंदगडमधून आमदार राजेश पाटील, हातकणंगलेतून माजी आमदार अमल महाडीक, तर राधानगरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

शिरोळ, आजरा तालुक्यात लक्षवेधी लढत

शिरोळ तालुक्यात आराेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व ‘दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यात लढत होत आहे. ‘आजरा’ तालुक्यात अशोक चराटी व सुधीर देसाई यांच्यात सामना होत आहे. येथे काटावरची लढाई असल्याने जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

असे आहे गटनिहाय मतदान-

गट क्रमांक -1 विकास संस्था - 1865

गट क्रमांक -2 प्रक्रिया संस्था - 448

गट क्रमांक -3 पतसंस्था, बँका - 1221

गट क्रमांक -4 दूध व इतर संस्था - 4116

एकूण - 7650

Web Title: Polling for Kolhapur District Central Co operative Bank today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.