जयंती नाल्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत : शुद्धीकरणाचे तीन पंप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:33 PM2019-12-21T16:33:15+5:302019-12-21T16:34:44+5:30
जयंती नाल्यातून दुषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी हीबाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावरच प्रक्रिया सुरु असल्याचे आढळून आले.
कोल्हापूर : जयंती नाल्यातून दुषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी हीबाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावरच प्रक्रिया सुरु असल्याचे आढळून आले.
जयंती नाला येथील पपिंग स्टेशनाजवळील बंधाऱ्यांतून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली.
याची गंभीर दखल घेत प्रशासनाने शनिवारी जयंती नाला परिसराची पाहणी केली. यावेळी पपिंग स्टेशनमधील सहा पंपा पैकी पाच पंप बंद आहेत. यामधील चार पंप अगोदरच बंद होते. १८ डिसेंबरला उर्वरीत एक पंपामध्येही बिघड झाला आहे. त्यामुळे एका पंपावर कामकाज सुरु आहे. यामुळेच प्रक्रिय विनाच नदीत दुषित पाणी जात असल्याचे समोर आले.