परदेशी तंत्रज्ञांकडून प्रदूषणाची पाहणी : पर्यावरण मंत्र्यांचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:12 AM2018-07-03T01:12:38+5:302018-07-03T01:12:46+5:30
कोल्हापूर : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्यात चार परदेशी तंत्रज्ञही सहभागी असून, त्यांनी पंचगंगा प्रदूषणाच्या काही ठिकाणांची सोमवारी पाहणी केली. या तंत्रज्ञांच्या कंपनीचा सौदी अरेबिया येथे मोठा प्रकल्प असून महाराष्ट्रामध्ये ५00 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्यासाठी ते इच्छुक असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तंत्रज्ञांशी चर्चा केली. यापैकी एक तंत्रज्ञ इंग्लंड, एक अमेरिका आणि एक आॅस्ट्रेलियाचा आहे.
पर्यावरणमंत्री कदम यांनी सोमवारी पंचगंगा प्रदूषणाबाबत घेतलेल्या बैठकीमध्ये कडक भूमिका घेतली होती. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रसंगी इंग्लंडच्या कंपनीची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कंपनीचे चौघे तंत्रज्ञ कदम यांच्यासोबतच दौºयात होते. त्यांनी प्रदूषणाच्या काही ठिकाणांचीही पाहणी केली.
विश्रामगृहावर झालेल्या कदम यांच्या बैठकीनंतर जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या तंत्रज्ञांशी काही गावांतील सांडपाणी आणि होणारे प्रदूषण याबाबतीत चर्चा केली. या बैठकीनंतर सायंकाळी या पथकाने गांधीनगरमधील सांडपाणी जिथे नदीत मिसळते तेथील पाहणी केली. अशा पद्धतीने चार-चार गावांचे सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी असल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, गटविकास अधिकारी सचिन घाटगे उपस्थित होते.
शौमिका महाडिक यांनी त्यांनी सुरू केलेल्या ‘नमामि पंचगंगा’ या उपक्रमाची माहिती या तज्ञांना देऊन जिल्हा परिषदेला याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली.बैठकीनंतर सोमवारी सायंकाळी या पथकाने गांधीनगरमधील सांडपाणी जिथे नदीत मिसळते तेथील पाहणी केली.चार चार गावांचे सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी असल्याचे यावेळी या तंत्रज्ञांनी सांगितले.
पंचगंगेचे प्रदूषण कमी करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत संबंधित विदेशी तंत्रज्ञांशी आम्ही चर्चा केली. विदेशामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना मोठी जागा उपलब्ध असते; परंतु आपल्याकडे निधीपेक्षाही जागेची मोठी टंचाई असते. प्रत्येक गावची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार छोटे छोटे प्रकल्प करावे लागणार आहेत. यादृष्टीने या तंत्रज्ञांशी चर्चा करण्यात आली.
- शौमिका महाडिक,
अध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूर
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आठ दिवसांत मंत्रालयात बैठक
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न यापूर्वीच सुटायला हवा होता. त्यामुळे येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिली.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात उपाययोजनांबाबत बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री कदम म्हणाले, पंचगंगा प्रदूषणासंदर्भात येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन ठोस उपाययोजना होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सध्या सांडपाणीयुक्त पाणी लोक पीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतची सर्व माहिती घेतली जात आहे. महापालिकेकडे निधी असतानाही कामे का होत नाहीत? ठेकेदारांची की अधिकाºयांची चूक आहे का? याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सर्व माहिती दिली जाणार आहे.
‘एमआयडीसी’तील कंपन्यांसह इचलकरंजीतील प्रोसेस
युनिटमधून प्रक्रियेविना प्रदूषित पाणी नदीत मिसळते अशा कंपन्यांवर कारवाईचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना दिले आहेत. ज्यांच्याकडे ‘एसटीपी’ नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये इचलकरंजी, हातकणंगले परिसरातील लक्ष्मी इंडस्ट्रिज दोनदिवसांत बंद करण्याचे आदेश दिले असून यामध्ये कोणालाही सूट नसल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले. पंचगंगा नदी शुद्ध करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून पुढील दोन महिने मी सातत्याने कोल्हापुरात येऊन उपाययोजनांबाबतचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात पहिल्यांदा महाराष्टतून ‘प्लास्टिक बंदी’ची सुरुवात
जागतिक पातळीवर प्लास्टिक बंदीचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्लास्टिकबंदीचे आवाहन केले; परंतु जग आणि देशपातळीवरील निर्णय होण्यापूर्वी तीन महिने अगोदर महाराष्टÑात हा निर्णय घेऊन एक पाऊल पुढेटाकले आहे, असे मंत्री कदमयांनी सांगितले. प्लास्टिकचे रिसायकल्ािंग कसे होईल यासाठी प्रयत्न असून ७० टक्के प्लास्टिक हे डांबरीकरणामध्ये वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.