खंडेनवमीनिमित्त होणार करवीरनिवासिनीच्या शस्त्रांची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:48 PM2017-09-28T16:48:39+5:302017-09-28T16:48:39+5:30
अष्टमीच्या जागरानंतर शुक्रवारी साजरा होणाºया खंडेनवमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच घरोघरीही देव उठण्याचा विधी करुन शस्त्रांचे पूजन केले जाते. यानिमित्त बाजारपेठेत लव्हाळा, झेंडूची फूले या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर, दि. २८ : अष्टमीच्या जागरानंतर शुक्रवारी साजरा होणाºया खंडेनवमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच घरोघरीही देव उठण्याचा विधी करुन शस्त्रांचे पूजन केले जाते. यानिमित्त बाजारपेठेत लव्हाळा, झेंडूची फूले या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
अष्टमीला देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर खंडेनवमीला शस्त्रांचे पूजन केले. घट हालवून देवतांचे पूजन केले जाते. या विधीला देव उठणे असे म्हणतात. देवांच्या पूजेसोबत घराघरातील दैनंदिन वापरातील लहान मोठ्या शस्त्रांचे पूजन केले जाते.
या पूजेसाठी कोल्हापुरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, बिंदू, चौक, टिंबर मार्केट, शिंगोशी मार्केट, मिरजकर तिकटी या बाजारपेठेत लव्हाळा आणि झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती.